AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Case: मोठी अपडेट! पोलिसांसमोर सिया गोयलने थेट… केतन अग्रवाल प्रकरणात खळबळजनक माहिती

Ketan Agarwal Case: पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवालच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. आता या प्रकरणात मोठे वळण आले आहे. सियाने मोठी कबूली दिली आहे.

Ketan Agarwal Case:  मोठी अपडेट! पोलिसांसमोर सिया गोयलने थेट... केतन अग्रवाल प्रकरणात खळबळजनक माहिती
Siya GoyalImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 24, 2026 | 3:05 PM
Share

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवालच्या हत्येच्या प्रकरणात मोठे वळण आले आहे. केतनच्या हत्येचा आरोप त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रेमी चेतन चौधरीवर करण्यात आला आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिस कोठडीत असलेल्या सिया आणि चेतनने मोठे विधान केले आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी दिनेश तायडे यांनी मोठी माहिती दिली आहे.

केतनची हत्या करून अपघाताचा बनाव

केतन अग्रवाल हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. दोन्ही आरोपी सिया आणि चेतन सध्या पोलीस कोठडीत आहेत. सियाने सांगितले की, ती केतनला लोहागड किल्ल्यावर घेऊन गेली होती. तिथे तिचा प्रेमी चेतनही उपस्थित होता. केतनला दरीत ढकलल्यानंतर दोघांनी हे नाटक रचले की, केतन चुकून पडला आणि हा अपघात होता. मात्र, पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर येत गेले आणि सिया-चेतन फसत गेले. शेवटी सियाने आपला गुन्हा कबूल केला.

मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे की, सिया केतनशी लग्न करू इच्छित नव्हती तर साखरपुज्याला नकार का दिला नाही? नात्यात होकार दिल्यानंतर केतनची जीव घेण्याची काय गरज होती? हा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. केतनच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, सिया खूप हट्टी होती. तिनेच हट्टीने केतनला लोहागड किल्ल्यावर नेले होते. मग तिने हे का कबूल केले नाही की, तिचे दुसऱ्यावर प्रेम आहे आणि ती केतनशी लग्न करू शकत नाही?

पोलीसांनी जेव्हा केतनच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी सुरू केली, तेव्हापासून त्यांना शंका होती की हा अपघात नसून, रचलेला कट असू शकतो. नंतर दोन्ही आरोपींना कठोरपणे विचारणा करण्यात आली. त्यानंतर सिया आणि चेतन यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितले की, केतनची हत्या करण्याचा प्लॅन आधीच तयार करण्यात आला होता. त्याचा मृत्यू अपघात म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला.

सीन रिक्रिएशनसाठी लोहागड किल्ल्यावर जाऊ शकते पोलीस टीम

तपास पुढे नेण्यासाठी पुणे पोलीस घटनास्थळी जाऊन सीन रिक्रिएट करू शकतात. यासाठी सिया आणि चेतन यांनाही घटनास्थळी नेले जाऊ शकते. सध्या दोन्ही आरोपींना पोलीस लॉकअपमधून बाहेर काढून पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. त्यांची पुढील चौकशी सुरू आहे.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?