Explained: मिडल फिंगरचा इशारा… उलट्या काळजाच्या सियाला जामीन मिळणार? केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा?

Ketan Agarwal Lohgad Murder Case: केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल ही उर्मटच नाही तर उलट्या काळजाची असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात तिला कुठलाच पश्चाताप झाला नसल्याचे समोर येत आहे. पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धोगेदोरे, पुरावे लागले आहेत का?

Explained: मिडल फिंगरचा इशारा... उलट्या काळजाच्या सियाला जामीन मिळणार? केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा?
केतन अग्रवाल, सिया गोयल, चेतन चौधरी
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 03, 2026 | 9:51 AM

Ketan Agarwal Siya Goyal Lohgad Murder Case: केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी याने त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात तिला कुठलाच पश्चाताप झाला नसल्याचे समोर आले आहे. तपासासाठी सियाला तिच्या घरी नेण्यात आले. उतरताना तिने माध्यमांकडे पाहून मधले बोट उंचावत अश्लील हावभाव केले. तिच्या या कृतीने ती उलट्या काळजाची असल्याची चर्चा होत आहे. आज सियासह चेतनला न्यायालयात हजर करण्यात येईल. तिची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्याचवेळी इंदुरमधील सोनम रघुवंशीप्रमाणे तिला जामीन मिळणार का, याचीही चर्चा सुरू आहे. तर या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे, पुरावे लागल्याचा दावा करण्यात येतो.

सोनम रघुवंशीला जामीन

राजा रघुवंशी याची सोनम रघुवंशी हिने प्रियकर आणि साथीदारांच्या मदतीने चेरापुंजीजवळ हत्या घडवून आणली होती. याप्रकरणात तिचा जामीन रद्द करण्यासाठी अपील करण्यात आले होते. पण हे अपील खारीज झाले होते. तर तिचा प्रियकर राज कुशवाहा याने सुद्धा जामीनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे सोनमप्रमाणेच सिया गोयल हिला सुद्धा जामीन मिळेल का, असा सवाल विचारल्या जात आहे.

गंभीर गुन्ह्यात जामीन मिळतो कसा?

गंभीर गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळतो कसा? असा सवाल समाजाला पडतो. पण कायदेशीर प्रक्रिया ही भावनेवर नाही तर परिस्थितीजन्य भक्कम पुराव्यांवर आणि युक्तीवादावर चालते. आरोपींचे वकील प्रकरणातील कमकुवत धागा पकडतात. छोटीशी चूकही आरोपीला दिलासा देणारी ठरते. कायद्याच्या कसोटीवर तपासाता त्रुटी आढळल्यास हीच आरोपीसाठी मोठी ढाल ठरते. पोलिसांच्या मेहनतीवर लागलीच पाणी फेरले जाते.

सोनम रघुवंशी हिला 9 जून 2025 रोजी पती राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हा इंटिमेशन ऑफ ग्राउंड्स ऑफ अरेस्ट हा दस्तावेज देण्यात आला होता. त्यात तिला अटक का करण्यात आली, याचे 17 कारणं देण्यात आली होती. पण पोलिसांनी सोनम हिला अटक करताना यापैकी एकाही पर्यायावर टिकमार्क केली नव्हती. या अर्जातील काही कारणं आणि पर्यायाचा या प्रकरणाशी काहीच संबंध नव्हता. या अर्जातील एक पर्याय डोकं चक्रावणारा होता. त्यात ती लष्करातून पळाल्याचे आणि भारताबाहेरील गुन्ह्यात तिचा सहभाग असल्याचा अंदाज होता.

कागदपत्रांवरील या उणिवाच सोनमसाठी ढाल ठरली. तिच्या वकिलांनी त्यावर जोरदार युक्तीवाद केला आणि सोनम तुरूंगातून बाहेर आली. पोलिसांनी इतकी मेहनत करून सोनमला गजाआड करण्यात आले. पण कागदी कारवाईत ही लढाई प्रशासन हरले. वकिलांनी पळवाटांनाच शस्त्र केले आणि सोनमला जामीन मिळाला. तिचा प्रियकर राजा कुशवाहा याने सुद्धा सोनमच्या मार्गावरच जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा?

पुण्याच्या लुल्लानगर येथील कॅफेत बसून कट रचला गेला, त्या ठिकाणी सियाला नेहून तपास करण्यात आला.फॉरेन्सिक लॅबमध्ये दोघांसह कामगार नीरज कुमारच्या पाठवलेल्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात आला. डिजिटल पुराव्यांचा तपास केला गेला. 31 मे, 4 जून आणि 14 जूनला हत्या करण्याचा प्रयत्न होता का? हे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी केली. काही नवे साक्षीदार समोर आल्याचा पोलिसांचा दावा, त्यांची आणि आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यात आली. हत्येपूर्वी लोहगड किल्ल्याची सिया आणि चेतनने किती वेळा रेकी केली? या कटासाठी किती वेळा भेटले? याची चौकशी करण्यात आली. आज दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येईल. यावेळी होणारा युक्तीवाद महत्त्वाचा ठरणार तर आहेच. पण पुरावे सुद्धा महत्त्वाचे असतील

दोषसिद्धीचे प्रमाण अवघे 37 टक्के

नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या 2023 मधील आकडेवारीनुसार, देशात हत्याच्या गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण अवघे 37 टक्के इतके आहे. याचा अर्थ ट्रायल पूर्ण झाल्यावरही जवळपास 62 टक्के हत्याप्रकरणातील आरोपी सहीसलामत बाहेर पडतात. संशयाचा फायदा त्यांना मिळतो. कायदेशीर पळवाटांचा फायदा त्यांना मिळतो. तर दोन तीन वर्षानंतर समाजही या घटना विसरतो. देशात दरवर्षी साधारणपणे 27 ते 28 हजार खूनाची प्रकरणे दाखल होतात.

Follow Us