AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Murder Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात तिसरा आरोपी कोण? पोलिसांचा संशय कुणावर? मोठी अपडेट समोर…

Ketan Agarwal Lohgad Murder Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात तिसरा आरोपी आहे का? या अनुषंगाने पोलीस तपास सुरू केला आहे. पोलिसांचा संशय कुणावर आहे? काय आली मोठी अपडेट?

Ketan Murder Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात तिसरा आरोपी कोण? पोलिसांचा संशय कुणावर? मोठी अपडेट समोर...
केतन खून प्रकरणात तिसरा आरोपी कोण?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 02, 2026 | 3:25 PM
Share

Ketan Agarwal Lohgad Murder Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे अटकेत आहेत. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उद्या त्यांची पोलीस कोठडी संपत आहे. त्यांना उद्या न्यायालयात हजर केल्या जाऊ शकते. पण पूर्वीपासूनच या खूनप्रकरणात तिसरा आरोपी असल्याची चर्चा होत आहे. पोलीसही या अनुषंगाने तपास करत आहेत. पोलिसांना याविषयी संशय आहे. तिसरा आरोपी कोण या संदर्भात पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत. काय आहे याविषयीची अपडेट?

तिसर्‍या आरोपीच्या अनुषंगाने तपास

लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) गजानन टोम्पे यांनी या प्रकरणात मोठी माहिती दिली आहे. त्यानुसार, आमच्या तपासाचा भाग म्हणून पुण्यात आम्ही सियाच्या घरी पंचनामा केला आहे. तिसरा आरोपी कोण ह्या संदर्भात आम्ही सर्व बाजूने तपास करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे पोलिसांना याप्रकरणात अजून कोणी संशयित असल्याचे समोर येत आहे.

सिया-चेतनचा खतरनाक प्लॅन

पुण्यातील एरिया ३७ च्या मागील बाजूस टेकडीवरून सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी सराव केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील तीन ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक आज सिया गोयल हिला पंचनामा करण्यासाठी घेऊन गेले होते. 18 जून रोजी केतन अग्रवाल खून प्रकरणात सियाला अटक करण्यात आली होती. आज पुणे ग्रामीण पोलिसांनी घटने पूर्वी आणि घटनेनंतर सियाने ज्या ज्या ठिकाणावर गेली तिथे पोलिसांनी पंचनामा केला आहे. सिया तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी ज्या ठिकाणी केतनला मारण्यासाठी सराव केला होता, तिथे सुद्धा पोलीस पथक आरोपींसह पोहचले. पुण्यातील एरिया ३७ च्या मागील बाजूस टेकडीवरून सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी सराव केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सियाला घेऊन पोलीस तिच्या घरी

पुणे ग्रामीण पोलीस आज सिया गोयल हिला घेऊन तिच्या घरी पोहचले. पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील घरात पुणे ग्रामीण पोलिसांनी सियाला आणले. घटनेनंतर सियाचे कपडे, मोबाईल, इतर गोष्टींचा पंचनामा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक सियाच्या घरी आले होते. 18 जून रोजी घटना घडल्यावर सियाने कुठले पुरावे नष्ट केले का याचा तपास पोलिसांनी यावेळी केला. उद्या मुख्य संशयित आरोपी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला न्यायालयात हजर केले जाऊ शकते.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना