AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Murder Case: तो ‘हुडी मॅन’ आणि चेतन एकच? केतन अग्रवाल खूनप्रकरणात मोठा ट्विस्ट… घरातून बाहेर पडताना त्याचा ड्रेस तर वेगळाच…

Ketan Agarwal Lohgad Murder Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात सातत्याने नवीन खुलासे होत आहेत. प्रकरणात अनेक धक्कादायक वळणं येत आहेत. चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी खूनानंतर निसटण्याचा फुलप्रुफ प्लॅन केला, पण पोलिसांनी तो उधळून लावला आहे. काय आहे मोठी अपडेट?

Ketan Murder Case: तो 'हुडी मॅन' आणि चेतन एकच? केतन अग्रवाल खूनप्रकरणात मोठा ट्विस्ट... घरातून बाहेर पडताना त्याचा ड्रेस तर वेगळाच...
तो 'हुडी मॅन' आणि चेतन एकच?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 02, 2026 | 9:10 AM
Share

Ketan Agarwal Lohgad Murder Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात अजून एक वळण आले आहे. 18 जून रोजी लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून धक्का देत त्याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे. उद्यापर्यंत दोघेही पोलीस कोठडीत आहेत. पोलीस विविध बाजूने तपास करत आहेत. दोघांची कसून चौकशी सुरू आहे. डिजिटल पुराव्यांसह सीन रिक्रएशनही करण्यात आले. दोघांनाही लोहगडावरून नेऊन पोलिसांनी पुतळा फेकायला लावण्यात आला. आता याप्रकरणात अजून एक खुलासा समोर येत आहे.

घरातून निघताना वेगळेच कपडे

केतन अग्रवाल याचा काटा काढण्याचा बेत सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी अनेक महिन्यांपूर्वी आखला. दोन ते तीन अयशस्वी प्रयत्नही झाले. पण केतनला कायमचे संपवायचेच या विचाराने दोघांनी पुन्हा 18 जून रोजी त्याला लोहगडावर नेले. केतनला चेतनने कड्यावरून ढकल्याचा आरोप करण्यात येतो. तो लोहगडवर हुडी घालून फिरत होता. तो या परिसरात 40 मिनिटेच होता. लोहगडावर चढायला आणि उतरायचा वेळ कमी केला तर तो मोजून 5 ते 10 मिनिटे गडावर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना तपास करताना अजून एक दुवा हाती लागला आहे. गडावर चढताना चेतन हुडीवर दिसत असला तरी घरातून निघताना मात्र त्याने वेगळेच कपडे घातलेले होते. आपल्यावर कुणाला संशय येऊ नये यासाठी त्याने हा कपडे बदल केला.

गुन्ह्यानंतर कोणीही लवकर ओळखू नये यासाठी त्याने कपडे बदलल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. लोहगडावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहरा लपवत हुडी घातलेला तरूण झटपट गड उतरताना दिसतो. तो चेतन असल्याचे तपासाअंती उघड झाले. पण त्याने घरातून निघताना आणि घरी परत जाताना मात्र वेगळाच पोषाख घातला होता. त्याने हे कपडे कुठे बदलले आणि हे कपडे कुठे लपवले याचा शोध पोलीस घेत आहेत.

दोघांना उद्या न्यायालयात हजर करणार

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना केतन अग्रवाल हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणात त्यांना आता तिसऱ्यांदा न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. उद्या दोघांची पोलीस कोठडी संपत आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत त्यांना पाच दिवसांची (3 जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयात दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला. पोलीस दोघांविरोधात भक्कम पुरावे गोळा करत आहेत. डिजिटल पुराव्यांची मोठी मालिकाच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. डिलिट केलेल्या चॅटमधून मोठा पुरावा हाती लागण्याची शक्यता आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना