AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Murder Case: पत्रिकेत जुळले 27 गुण! तरीही तिने केला होणाऱ्या पतीचा खून, सिया आणि केतनाच्या पत्रिकेत कोणता योग?

Siya Goyal and Ketan Kunali 27 Gunas: सिया आणि केतन अग्रवाल यांची लग्न पत्रिका जुळली होती. दोघांची कुंडली पाहण्यात आली. दोघांचे 36 पैकी 27 गुण जुळले. केतन देवगण तर सियाचा मनुष्य गण असल्याचे पुत्रिकेवरून समोर आले आहे. तरीही सियाने प्रियकरासोबत केतनचा जीव घेतल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Ketan Murder Case: पत्रिकेत जुळले 27 गुण! तरीही तिने केला होणाऱ्या पतीचा खून, सिया आणि केतनाच्या पत्रिकेत कोणता योग?
पत्रिकेत जुळले 27 गुण! तरीही तिने केला होणाऱ्या पतीचा खूनImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 01, 2026 | 1:59 PM
Share

Ketan Agarwal Lohgad Murder Case: गोयल आणि अग्रवाल कुटुंब सिया आणि केतन यांचे नाते परफेक्ट मॅच मानत होते. दोघांची लग्न पत्रिका जुळवण्यात आली. दोघांचे 27 गुण जुळले. कुटुंबाच्या ज्योतिषाने हा आदर्श जोडा असल्याचा दावा केला. परंपरेनुसार दोघांचा साखरपुडा झाला. पण काहीच महिन्यात जे घडले त्याने आकाशातील ग्रह तारे सुद्धा लटलटले. सियाने प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत केतन याला लोहगड किल्ल्यावरून खोल दरीत ढकलले. खोल दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने देश हादरला. प्रत्येक घरात सिया, केतन, चेतन यावर चर्चा सुरू झाली. देशातील सामाजिक प्रश्न ऐरणीवर आला.

जुळले 27 गुण, तरीही केला खून

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2026 मध्ये केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्या लग्न ठरवण्यासाठी अगोदर लग्न पत्रिका पाहण्यात आली. दोघांच्या जन्म पत्रिकांआधारे ज्योतिषाने विवाह योग आहे की नाही याची ग्रहांच्या साक्षीने लग्न पत्रिका तयार केली. दोघांच्या पत्रिकेआधारे लग्न पुत्रिकेत 36 पैकी 27 गुण उतरले. हा लग्नासाठी शुभ योग मानल्या जातो. ज्योतिष गणनेनुसार, केतन देवगण तर सियाचा मनुष्य गण असल्याचे समोर आले. ज्योतिषाने गुण जुळत असल्याने लग्न यशस्वी होण्याचे संकेत दिले. त्यामुळे दोन्ही कुटुंब आनंदात होते. साखरपुडाही धूमधडाक्यात झाला. त्यानंतर लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. नोव्हेंबर 2026 मध्ये हे लग्न होणार होते. सियासोबत सुखी आयुष्याची स्वप्न रंगवणाऱ्या केतनला तिची आपली मारेकरी ठरेल हे स्वप्नातही वाटले नाही.

चेतनवर मन जडलेल्या सियाने केतनला आयुष्यातूनच बाद करण्याचा खतरनाक प्लॅन आखला. दोन तीन प्रयत्न करूनही केतनला मारता आले नाही. पण ती योग्य संधीच्या शोधात होती. तिने त्याच्यासोबत प्रेमाचे नाटक केले. 19 जूनला वाढदिवस असल्याने अगोदरच्या दिवशी तिने केतनला लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगच्या बहाण्याने नेले. तिते अगोदरच चेतन चौधरी वाट पाहत थांबलेला होता. गप्पा मारत तिने केतनला एका निर्जनस्थळी नेले. तिथे संधी मिळताच चेतनसह सियाने केतनला धक्का दिला. तो दरीत कोसळल्याची खात्री पटताच आरडाओरड केली. तो मेला की नाही याची खात्री होईपर्यंत ती भेदरलेली होती. त्याचा मृतदेह बाहेर आणल्यावरही तिच्या चेहऱ्यावर दुखाचे सावट नव्हते. पोलिसांना सिया आणि चेतनचे चॅट, दोघांमधील तासन तास बोलणे खटकलं आणि नंतर केतनचा अपघाती मृत्यू नसून घातपात असल्याचे समोर आले. सिया आणि चेतन विरोधातील आरोपासंबंधी पुरावे पोलीस गोळा करत आहेत.

दोघांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

केतन अग्रवाल हत्या प्रकरणी तपासाला वेग आला आहे. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत आहेत. न्यायालयाने दोघांना 3 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 28 जून रोजी पोलीस सिया गोयलला लोहगडावर घेऊन गेले होते. तिथे पोलिसांनी गुन्ह्याचं रिक्रिएशन केले होते. तर आज तिचा प्रियकर चेतन चौधरी याला लोहगडावर नेऊन रिक्रिएशन करण्यात आलं. 18 जून रोजी चेतन ज्या वेशभुषेत होता, तसेच आज त्याला लोहगडावर नेण्यात आले. जिथून केतनला धक्का देण्यात आला. तिथून चेतनने पुतळ्याला धक्का दिला. केतनच्या हत्येच्या दिवशी त्याला कशा पद्धतीने ढकलण्यात आले याची माहिती पोलीस घेत आहेत.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ