AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Case: माझी लेक आताच वाईट दिसू लागली का? सियाच्या आईचा सवाल; दारूबाबत…

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अटक झालेल्या सिया गोयलच्या आईने मुलीवरील आरोपांना आव्हान दिले आहे. 'माझी मुलगी आताच वाईट कशी दिसू लागली?' असा सवाल करत त्यांनी दारूच्या सवयी आणि पार्टीसंबंधीच्या दाव्यांचे खंडन केले. लग्नाच्या तयारीपासून ते आताच्या बदनामीपर्यंत, सर्व घडामोडींवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Ketan Agarwal Case: माझी लेक आताच वाईट दिसू लागली का? सियाच्या आईचा सवाल; दारूबाबत...
Siya Goyal motherImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 27, 2026 | 3:55 PM
Share

केतन अग्रवाल याची हत्या झाल्यानंतर त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिला अटक करण्यात आली आहे. सियाला अटक केल्यानंतर तिच्याबाबतच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सिया ही दारू प्यायची. तिला अनेकदा दारू पिणं बंद करायला सांगितलं होतं. तसेच तिला पार्ट्यांना जाऊ नको म्हणूनही सांगितलं होतं, असं केतनच्या आईचं म्हणणं आहे. त्यावर सियाच्या आईने काही सवाल केले आहेत. माझी मुलगी ड्रिंक्स करत नव्हती, असं सांगतानाच इतके दिवस माझी मुलगी चांगली होती. आताच माझी मुलगी वाईट कशी दिसू लागली? असा सवाल सियाची आई पूजा गोयल यांनी केला आहे.

पूजा गोयल यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. माझी मुलगी ड्रिंक्स करत नव्हती. तिच्या ड्रिंक्स आणि पार्टीबाबत केतनच्या कुटुंबीयांनी कधीच आम्हाला सांगितलं नाही. ती कधी ड्रिंक करत नव्हती. ती ड्रिंक करायची हे पहिल्यांदाच कळलं, असं सांगतानाच कालपर्यंत सिया चांगली होती. आज मात्र ती वाईट झाली. तिची बदनामी सुरू करण्यात आली आहे, असं पूजा गोयल म्हणाल्या.

त्यांनी सांगायला हवं होतं

सिया आणि केतनच्या लग्नाच्या आम्हाला बऱ्याच अपेक्षा होत्या. अग्रवाल कुटुंब सियावर खूप प्रेम करत होतं. त्यांनी सियाच्या वाढदिवसाचं आयोजन केलं होतं. सिया आणि केतनचं जमत नव्हतं तर आम्हाला सांगायला हवं होतं. मुलीने लग्नाला कधी विरोधच केला नव्हता, असं सांगतानाच केतन सोबत आमचं रोज बोलणं व्हायचं. सकाळी आणि रात्री केतन रोज व्हिडीओ कॉल करायचा. तो अत्यंत चांगला मुलगा होता. फक्त अग्रवाल कुटुंबाने त्यांचा मुलगा गमावला नाही, तर आम्हीही आमचा मुलगा गमावला आहे, असं त्यांनी सांगितलं.

असं व्हायला नको होतं…

उदयपूरमध्ये लग्नासाठी अनंत रिसॉर्ट बूक केला होता. लग्नासाठी 14-15 कोटी खर्च करण्याचा सवाल नव्हता. रिसॉर्टसाठी 3 कोटी खर्च होता. लग्नाला पाच साडेपाच कोटी खर्च करायचे होते. जेट बूक झाले नव्हते. जुलै एंडिंगला बुकिंग करायची होती. मला सियापेक्षाही केतन अधिक जवळचे होते. त्यांच्यावर आमचं प्रेम होतं. जवळीक होती. पण असं व्हायला नको होतं. ज्याने कोणी केलं त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. किंवा आरोपीचा लोहगडावरूनच कडेलोट करा, अशी मागणी त्यांनी केली.

चार तासांपासून चौकशी

दरम्यान, केतन हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिचे आई-वडील आणि भाऊ साहिल यांची गेल्या 4 तासांपासून लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. साहिलला काल पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. या चौकशीदरम्यान हत्याकांडाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिस तपासाला यामुळे नवे धागेदोरे मिळण्याची अपेक्षा आहे.

इतरांचीही चौकशी करू

सियाच्या आई-वडिलांची चौकशी सुरू आहे. गरज असल्यास इतरांचीही चौकशी करण्यात येणार आहे. साहिल आणि चेतन हे क्रिकेट खेळत होते. त्यांची मैत्री होती. सियाची देखील तिथं ओळख झाली का? याचा तपास सुरू आहे. आमचा सखोल तपास सुरू आहे. त्यासाठी वेगवेगळ्या टीम बनवलेल्या आहेत, अशी माहिती लोणावळ्याचे डीवायएसपी गजानन टोम्पे यांनी दिली.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन