केपी गोसावी पोलीस आयुक्तालयात, 3 वाजता कोर्टात हजर करणार; जामीन होणार?

| Updated on: Oct 28, 2021 | 10:37 AM

आर्यन खान प्रकरणातील पंच केपी गोसावी याला अटक केल्यानंतर अखेर पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. (Kiran Gosavi, NCB’s 'Witness' in Mumbai Cruise Drug Bust Case, Detained in Pune)

केपी गोसावी पोलीस आयुक्तालयात, 3 वाजता कोर्टात हजर करणार; जामीन होणार?
Kiran Gosavi
Follow us on

पुणे: आर्यन खान प्रकरणातील पंच केपी गोसावी याला अटक केल्यानंतर अखेर पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे गोसावीला जामीन मिळतो की पोलीस कोठडी? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

केपी गोसावीला आज सकाळीच अटक केल्यानंतर त्याला आज पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलं. पोलीस आयुक्तालयात त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. चौकशीनंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर दुपारी 3च्या सुमारास त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे, अशी माहिती चिन्मय देशमुख प्रकरणातील वकील हर्षल गरुड यांनी सांगितलं.

गोसावी नेमका कोण?

केपी अर्थात किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला होता.

तरुणाची फसवणूक

पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची 2018 मध्ये फसवणूक केल्याचा गोसावीवर आरोप आहे. देशमुखला मलेशियात नोकरी लावण्याच्या आमिषाने किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी त्याची तीन लाखांना फसवणूक केली होती. त्यानंतर 2018 मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली.

अनेकांना गंडा?

गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचं सांगण्यात येतं. परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने गोसावीने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.

 

संबंधित बातम्या:

KP Gosavi | अखेर के पी गोसावी पुणे पोलिसांच्या जाळ्यात, सकाळीच अटकेची कारवाई

CCTV VIDEO | नाशकात शालेय मुलांची रस्त्यात हाणामारी, तलावात बुडवून विद्यार्थ्याची हत्या

राष्ट्रवादीत प्रवेश न करणाऱ्या नगरसेवकांची नावंही यादीत, टीम ओमी कलानीवर नामुष्की

(Kiran Gosavi, NCB’s ‘Witness’ in Mumbai Cruise Drug Bust Case, Detained in Pune)