Pune rain : सरीवर सरी..! पुढचे काही दिवस पावसाच्या हलक्या सरींनी पुणेकर भिजणार; हवामान विभागानं काय म्हटलं? वाचा सविस्तर…

शहरात पावसाचे मुख्य कारण म्हणजे जोरदार पश्चिमेकडील वारे होय. अशा वातावरणामुळे पुण्यात पुढचे काही दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हलक्या सरी बरसत राहतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Pune rain : सरीवर सरी..! पुढचे काही दिवस पावसाच्या हलक्या सरींनी पुणेकर भिजणार; हवामान विभागानं काय म्हटलं? वाचा सविस्तर...
पावसाच्या सरीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 11:00 PM

पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यात पुढील काही दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) याबाबतची माहिती दिली आहे. शिवाजीनगर येथे शुक्रवारी 4.1 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. पुणे शहरासाठी जुलै महिन्याची सुरुवात हलक्या पावसाने (Light rain) झाली असून जूनच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. आयएमडीच्या मते, पुणे शहरातील शिवाजीनगर येथे शुक्रवारी 4.1 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. तर पाषाण येथे 5.2 मिमी, लोहगाव 0.8 मिमी, लवळे 7 मिमी आणि मगरपट्टा येथे 01 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दिवसभर शहराच्या विविध भागात हलक्या सरी आणि सतत ढगाळ वातावरण (Cloudy weather) होते. दरम्यान, पाऊस कमी झाल्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीचेदेखील संकट आहे. मात्र सध्यातरी पावसाच्या शिडकाव्याने पुणेकर आनंदी झालेत.

धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी

आयएमडीचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले, की शहरात पावसाचे मुख्य कारण म्हणजे जोरदार पश्चिमेकडील वारे होय. अशा वातावरणामुळे पुण्यात पुढचे काही दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस हलक्या सरी बरसत राहतील, असे ते म्हणाले. मात्र, पुण्याच्या आसपासच्या चार धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाच्या म्हणण्यानुसार, चार धरणांमध्ये एकूण 2.55 हजार दशलक्ष घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत तो 8.66 टीएमसी होता. विभागानुसार, चार धरणे मिळून 1 जुलै रोजी 29.72 टक्के भरलेली असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 8.75 टक्के भरली आहेत.

हे सुद्धा वाचा

जूनमध्ये पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पानशेत धरण 1.09 टीएमसीसह 10.26% क्षमतेवर आहे. वरसगाव 1.04 टीएमसीसह 8.08%वर आहे. खडकवासला फक्त 0.42 टीएमसीसह 21.39% आहे तर टेमघर धरण शून्य आहे. जूनमध्ये पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाला. पुणे आणि मुंबईच्या आसपासच्या धरणांच्या घाट क्षेत्र आणि पाणलोट क्षेत्रात जूनमध्ये कमी पाऊस झाला आहे. या कमी पावसाचा परिणाम म्हणून पुणेकरांवर आता  पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.