AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Water cut : कमी पावसानंतर आता पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट! महापालिका लवकरच करणार घोषणा

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतून पुणे शहराला पाणीपुरवठा होतो. नुकतेच भामा आसखेड धरणातूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाला असून त्यामुळे पाणीसाठ्यात घट झाली आहे.

Water cut : कमी पावसानंतर आता पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट! महापालिका लवकरच करणार घोषणा
Image Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jul 01, 2022 | 3:21 PM
Share

पुणे : पुण्यात पुढील आठवड्यापासून पाणीकपात होणार आहे. पावसाची कमतरता आणि पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये कमी पाणी असल्याने पुणे महानगरपालिका (PMC) पुढील आठवड्यापासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. शहरात आणि परिसरात पावसाची कमतरता (Deficit rainfall) आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल आणि त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Commissioner Vikram Kumar) यांनी सांगितले आहे. धरणक्षेत्रात पावसाच्या कमतरतेमुळे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता अशाप्रकारचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महापालिका सहसा 1,650 एमएलडी पाणी घेते.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतून पुणे शहराला पाणीपुरवठा होतो. नुकतेच भामा आसखेड धरणातूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाला असून त्यामुळे पाणीसाठ्यात घट झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 2.5 टीएमसी पाणीसाठा आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने पीएमसीला पाणी काटकसरीने वापरण्यासाठी सतर्क केले आहे, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

‘…तर संपूर्ण प्रणालीवरच परिणाम’

पर्यायी दिवसाचा पाणीपुरवठा अशाप्रकारे केला जाईल, की एका दिवसात फक्त 30 टक्के पाणीकपात केली जाईल. पुरवठा नेटवर्कमध्ये कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करण्यासाठी नागरी प्रशासनाने तांत्रिक बाबीदेखील लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या योग्य प्रकारे न केल्यास पूर्ण प्रणालीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे आयुक्त म्हणाले.

जलसंपदा विभागाने फटकारले

वाटप केलेल्या कोट्यापेक्षा जास्त पाणी उपसल्याबद्दल पुणे महापालिकेला राज्याच्या जलसंपदा विभागाने फटकारले असून यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहराच्या हद्दीत गावांचा समावेश झाला असून शहराची लोकसंख्या वाढली आहे, असे सांगत पुणे महापालिका पाण्याचा कोटा वाढविण्याची मागणी करत आहे. महापालिकेतर्फेही शहरात 24/7 पाणीपुरवठा प्रकल्प राबवला जात आहे आणि केंद्र सरकारने पुढील वर्षात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Follow Us
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा