AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder Case : केतन जिवंत आहे… ते शब्द ऐकताच सियाला दरदरून घाम फुटला, हातपाय लटपटायला लागले, पुढे काय घडलं?

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवीन खुलासे समोर आले आहेत. केतन जिवंत असल्याचे सांगितल्यावर सियाला घाम फुटून हातपाय थरथरले, ही बाब समोर आली आहे. लोहगडावरील पोलिसांच्या माहितीनुसार, सिया घाबरलेली होती, पण रडत नव्हती. याशिवाय, केतन आणि सियाने तिकिटाशिवाय गडावर प्रवेश केल्याचेही उघड झाले आहे, ज्यामुळे प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

Ketan Agarwal Murder Case : केतन जिवंत आहे... ते शब्द ऐकताच सियाला दरदरून घाम फुटला, हातपाय लटपटायला लागले, पुढे काय घडलं?
केतन जिवंत आहे... ते शब्द ऐकताच सियाची प्रतिक्रिया
| Updated on: Jun 24, 2026 | 7:59 PM
Share

केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. केतनच्या हत्येची कारणं समोर आली आहेत. मात्र, केतनला लोहगडावर नेमका धक्का कुणी दिला? सिया की चेतनने? हे अद्याप उघड झालेलं नाही. तसेच केतनची डेडबॉडी आल्यावर सियाने कोणतीही रिअॅक्शन दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं आहे. आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीच्या दाव्यानुसार, केतन जिवंत आहे, असं जेव्हा सियाला सांगण्यात आलं तेव्हा तिला दरदरून घाम फुटला होता. तिचे हातपाय लटपटायला लागले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

लोहगडावर पोलीस चौकी आहे. तिथे काही पोलीस तैनात आहेत. तिथल्या एका पोलिसाने आणि सेक्युरिटी गार्डने धक्कादायक माहिती दिली. कोणी तरी गडावरून खाली पडल्याचं त्यांना कळलं. माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. यावेळी सिया घाबरलेली होती. पण ती रडत नव्हती. ती मदतीसाठी जोरजोरात ओरडत होती, असं या पोलिसांनी सांगितलं.

कुटुंबाला कळवलं…

सियाने सर्वात आधी केतन पडल्याची माहिती कुटुंबाला दिली. तर आम्ही आमच्या सीनिअर्सला दिली. रुग्णवाहिका मागवली. सियाने सांगितल्यानुसार केतन जिथे घसरून पडला तिथे पोलीस पोहोचले. सियाला रस्त्यावर उभं करण्यात आलं होतं. तर पोलीस केतनला शोधण्यासाठी जंगलात गेले होते. पोलिसांनी केतनची डेड बॉडी पाहिली आणि रुग्णवाहिकेची वाट पाहत थांबले, असं हा पोलीस कर्मचारी म्हणाला.

ती थरथरत होती…

यावेळी या पोलीस कर्मचाऱ्याने एक धक्कादायक माहिती दिली. जेवढे पोलीस जंगलातून बाहेर येत होते, त्या सर्वांना पाहून सिया केतनच्या बाबत विचार होती. त्याची माहिती घेत होती. पण तिच्या डोळ्यात पाण्याचा एक टिपूसही नव्हता. केवळ ती घाबरलेली होती. थरथरत होती. त्यामुळे तिला अधिक धक्का बसू नये म्हणून केतन जिवंत आहे. तो ठिक आहे. गंभीर जखमी झालाय, असं तिला सांगितलं जात होतं. पण वास्तवात केतनचा मृत्यू झालेला होता. पण सियाला मानसिक धक्का बसू नये म्हणून पोलीस तिला तसं सांगत होते. पण त्यामुळे सिया अधिकच घाबरून गेली होती. ती अधिकच थरथरत होती. केतन ठिक असल्याचं सांगितलं जात असल्याने तिच्या पोटात गोळा येत होता. आपली पोलखोल होईल ही भीती तिला सतावत होती. ती थरथर होती हे पोलिसांनी नोटीस केलं. पण त्याकडे दुर्लक्ष केलं, असं या पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलं.

घाईत निघून गेला

तर लोहगडावरील तिकीट काऊंटरवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याने वेगळीच माहिती दिली. सिया आणि केतन टिकट खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करत होते. पण इंटरनेट नसल्याने पेमेंट होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी परत येताना पैसे देणार असल्याचं सांगितलं. आणि वर निघून गेले. विदाऊट तिकीटच दोघे वर गेले. सियाचा प्रियकर चेतन चौधरीनेही वर्कआऊटचा बहाणा बनवला आणि तिकीट न घेताच तो वर निघून गेला. त्यानेही परत आल्यावर पैसे देणार असल्याचं सांगितलं. नंतर हत्या झाल्यावर तो घाईतच निघून गेला. त्याने पैसे दिले नाहीत.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत