PCMC election : पुढील मंगळवारी निघणार पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या महिला आरक्षणाची सोडत, तिसऱ्या जागेची उत्सुकता

PCMC election : पुढील मंगळवारी निघणार पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या महिला आरक्षणाची सोडत, तिसऱ्या जागेची उत्सुकता
पिंपरी चिंचवड महापालिका भवन
Image Credit source: tv9

एससी आणि एसटीच्या एकूण 25 चिठ्ठ्या बाजूला ठेवल्या जातील. उर्वरित 114 जागांतून सर्वसाधारण खुल्या गटातील महिलांच्या 57 जागांसाठी चिठ्ठ्या काढल्या जातील. त्यासाठी प्रथम प्रभागातील अ जागेवरील चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत.

रणजीत जाधव

| Edited By: प्रदीप गरड

Jun 17, 2022 | 4:06 PM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (PCMC Election) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण खुला गटातील जागेसाठी महिला आरक्षण (Women reservation) सोडत येत्या मंगळवारी (31 मे) सकाळी अकरा वाजता येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढली जाणार आहे. एकूण 139 जागांपैकी महिलांच्या 70 जागा कोणत्या हे यादिवशी स्पष्ट होणार आहे. त्रिसदस्यीय 46 प्रभाग रचनेला 12 मे रोजी आयोगाची अंतिम मंजुरी मिळाली. प्रभागरचना 13 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली. आरक्षण सोडतीचा (Lottery) कार्यक्रम घेण्याच्या सूचना महापालिकेस सोमवारी (23 मे) मिळाल्या. त्यानुसार पुढील मंगळवारी सोडत काढली जाणार आहे. काचेच्या बरणीत चिठ्ठ्या टाकून विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढली जाणार आहे. या सोडतीचे चित्रिकरणही केले जाणार आहे. प्रथम एससीच्या एकूण 22 जागांपैकी महिलांसाठी 11 जागांची सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर एसटीच्या एकूण 3 जागांपैकी महिलांच्या 2 जागांची सोडत काढली जाईल.

एका प्रभागात जास्तीत जास्त दोन महिलांच्या जागा आरक्षित

एससी आणि एसटीच्या एकूण 25 चिठ्ठ्या बाजूला ठेवल्या जातील. उर्वरित 114 जागांतून सर्वसाधारण खुल्या गटातील महिलांच्या 57 जागांसाठी चिठ्ठ्या काढल्या जातील. त्यासाठी प्रथम प्रभागातील अ जागेवरील चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत. त्यानंतर ब जागेवरील चिठ्ठ्या निघतील. उर्वरित राहिलेल्या जागा या सर्वसाधारण खुला गटासाठी असतील. मात्र एका प्रभागात जास्तीत जास्त दोन महिलांच्या जागा आरक्षित असणार आहेत.

तिसरी जागा खुल्या वर्गासाठी

एका प्रभागात सर्वच्या सर्व तीन महिलांचे आरक्षण काढले जाणार नाही. तिसरी जागा ही शिल्लक असलेल्या त्या-त्या गटाच्या खुल्या वर्गासाठी असेल. सांगवी प्रभाग 46मध्ये चार जागा आहेत. त्यात दोन जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. सोडत काढल्यानंतर प्रभागाची अंतिम आरक्षण यादी प्रसिद्ध केली जाते. त्यावर सूचना आणि हरकती स्वीकारल्या जात नाहीत. मात्र यंदा प्रथमच आरक्षण सोडतीनंतर 1 ते 6 जून असे सहा दिवस सोडतीसंदर्भात हरकती आणि सूचना स्वीकारल्या जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

तिसऱ्या जागेची उत्सुकता

13 जूनला प्रभागनिहाय आरक्षण अंतिम करून ते प्रसिद्ध केले जाणार आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक 41 आणि 44मध्ये एससी आणि एसटी असे दोन्ही जागेचे आरक्षण आहे. त्यामुळे तिसरी जागा खुली राहणार की महिला आरक्षण असणार याची उत्सुकता आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें