AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माफिया असदचे पुणे कनेक्शन आले समोर, पुण्यात अबू सलेम अन् कोणी केली व्यवस्था?

उत्तर प्रदेशातील गाजलेल्या उमेश पालच्या हत्येनंतर अतिक अहमद, अशरफ असद आणि शूटर गुलामला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण असदचे एनकाऊंटर झाले. त्याचे पुणे कनेक्शनही समोर आले आहे. त्या पुण्यात आश्रय देणाऱ्याचा शोध सुरु आहे.

माफिया असदचे पुणे कनेक्शन आले समोर, पुण्यात अबू सलेम अन् कोणी केली व्यवस्था?
अतिक अहमद अन् असद
| Updated on: Apr 14, 2023 | 11:15 AM
Share

पुणे : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचवेळी आतिक अहमद याचा मुलगा असद याचे एनकाऊन्टर झाले. गेल्या २२ ते २५ दिवसांपासून फरार असणाऱ्या असद आणि शूटर गुलामला ठार मारण्यात आले. त्यांच्यांवर पाच लाखांचे बक्षीस उत्तर प्रदेश पोलिसांनी जाहीर केले होते. आता या काळात असीद कुठे होता, त्याची व्यवस्था कोणी केली? ही चौकशी सुरु झाली आहे. त्यात असीद याचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. पुण्यात त्याला आश्रय देणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

महाराष्ट्रात कोणी केली मदत

उमेश पालच्या हत्येनंतर अतिरकृ अहमद, अशरफ असद आणि शूटर गुलामला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. अशरफ तुरुंगातूनच फेसटाइम अ‍ॅपद्वारे शूटर्सच्या संपर्कात होता आणि त्यांना कोणाकडे राहायचे हे सांगण्याची सूचना देत होता. पुणे शहरात लपण्यासाठी गँगस्टर अबू सालेमच्या जवळच्या मित्रांचीही असदने मदत घेतली. यूपी पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असदला दिल्लीत लपण्यासाठी एका नेत्याने मदत केली होती.

असा झाला असदाचा प्रवास

अतिक अहमदने मुलाला वाचवण्यासाठी सर्व यंत्रणा वापरल्या. उमेश पाल खून प्रकरणानंतर असद आणि गुलाम प्रथम प्रयागराजहून कानपूरला पाठवण्याता आले. त्यानंतर बसने नोएडा गाठले. असदने शिक्षणासाठी अनेकवेळा नोएडामध्ये राहिला होता. त्यामुळे तो तिथेच थांबला. मात्र उत्तर प्रदेशचे एसटीएफ तिथे पोहोचू शकेल, असे वाटल्याने त्यांनी दिल्ली गाठली.

दिल्लीतील तो नेता कोण

दिल्लीत असदची व्यवस्था एका नेत्याने केली. दिल्लीच्या संगम विहारमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. आता तो नेताही पोलिसांच्या रडारवर आला आहे. १४ मार्चपर्यंत दिल्लीत राहिल्यानंतर दोघेही अजमेरला रवाना झाले. यानंतर अशरफने अचानक असदला बरेली कारागृहातून फेस टाईमद्वारे नाशिकला जाण्यास सांगितले. नाशिकहून असद आणि गुलाम पुणे शहरात पोहोचले, तिथे अबू सालेमच्या जवळच्या मित्रांनी त्यांची राहण्याची व्यवस्था केली.

फेसटाइम आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संवाद

उमेश पाल हत्येनंतर सर्व शूटर फेसटाइम आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून बोलत असल्याचे पुरावे यूपी एसटीएफला मिळाले आहेत. एवढेच नाही तर अशरफ सर्व शूटर्सना बरेली जेलमधून पळून जाण्याचा मार्ग आणि जागा सांगत होता.

काय आहे प्रकरण

24 फेब्रुवारी रोजी प्रयागराजमध्ये उमेश पाल आणि त्याच्या दोन बंदूकधारी जवानांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. उमेश पाल हा राजुपाल हत्याकांडातील साक्षीदार होता. या प्रकरणात अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ, मुलगा असद आणि इतर शूटर्स आरोपी होते. 24 फेब्रुवारीपासून पोलीस असद, अरमान, गुलाम, गुड्डू मुस्लिम आणि साबीरचा शोध घेत होते. त्यांच्यावर ५-५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

आता पोलिसांनी असद आणि गुलामचे एन्काउंटर केले आहे. अरमान, गुड्डू मुस्लिम आणि साबीर या तीन नेमबाजांचा शोध सुरू आहे. यापूर्वी पोलिसांनी अरबाज आणि विजय चौधरी उर्फ ​​उस्मान या दोन नेमबाजांना चकमकीत ठार केले होते.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.