Video : पुण्यात लॉकडाऊनचं सर्कुलर पोहोचतं पण मोफत शिवभोजन थाळीचं नाही? पहा काय घडतंय?

| Updated on: Apr 15, 2021 | 4:15 PM

गरजू लोकांसाठी शिवभोजन थाळी मोफत मिळेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे पुण्यात मात्र सरकारचं सर्क्युलर आलं नसल्यामुळे नागरिकांना शिवभोजन थाळीसाठी पैसे मोजावे लागत आहेत.

Video : पुण्यात लॉकडाऊनचं सर्कुलर पोहोचतं पण मोफत शिवभोजन थाळीचं नाही? पहा काय घडतंय?
Follow us on

पुणे : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. या काळात हातावर पोट असणाऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. तसंच गरजू लोकांसाठी शिवभोजन थाळी मोफत मिळेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे पुण्यात मात्र सरकारचं सर्क्युलर आलं नसल्यामुळे नागरिकांना शिवभोजन थाळीसाठी पैसे मोजावे लागत आहेत. (Shivbhojan thali is still sold in Pune, Center director claims that no circular has been received)

पुण्यातील शिवभोजन थाळी केंद्रांवर गरीब, गरजू लोक भूक भागवतात. कोरोना काळात शिवभोजन थाळीची किंमत 5 रुपये करण्यात आली होती. पण आता राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर शिवभोजन थाळी मोफत देण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना सांगितलं होतं. पण पुण्यातील शिवभोजन थाळी केंद्रांवर नागरिकांना आजही पैसे मोजावे लागत आहेत. सरकारकडून अद्याप सर्क्युलर मिळालेलं नाही. त्यामुळे सर्क्युलर आल्याशिवाय आम्हाला मोफत जेवण देता येणार नाही, असं केंद्र चालकाने सांगितलं.

राज्य सरकारकडून गरीबांसाठी काय?

लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी विविध वर्गातील नागरिकांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली. राज्यातील 7 कोटी लाभार्थींना पुढील 1 महिना 3 किलो गहू 2 किलो तांदूळ देणार. पुढचा एक महिना 2 लाख शिवभोजन थाळ्या मोफत देणार. आधी 10 रुपयांची थाळी 5 केली आता मोफत करणार. ही सरकारची जबाबदारी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील 35 लाख लोकांना 1000 रुपये आगाऊ देणार, तसेच राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये देणार. त्याचा 12 लाख कामगारांना उपयोग होणार आहे. आदिवासी कुटुंबाना प्रति कुटंब 2000 रुपये देत आहोत. त्यांची संख्या 12 लाख आहे. त्याशिवाय घरेलू कामगारांनाही आर्थिक मदत देण्यात येणार असून अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

5476 कोटीचा निधी

कोविड संदर्भातील सुविधा उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी 330 कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत. तसेच या सर्व पॅकेजसाठी 5476 कोटी रुपये निधी बाजूला काढून ठेवले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

पुण्यातील सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदी, महापालिकेचे आदेश

Pune Lockdown : राज्य सरकारचं पुण्याकडे साफ दुर्लक्ष, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा गंभीर आरोप

Shivbhojan thali is still sold in Pune, Center director claims that no circular has been received