AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul Election : मुख्यमंत्र्यांनी नुसतं वटारलं तर तुमचं साम्राज्य एका दिवसात… चंद्रकांतदादांची सतेज पाटलांना थेट धमकी

गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटलांना थेट धमकी दिली आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापूर्वी आपली उंची बघा, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी नुसते वटारले तरी तुमचे साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, असा इशारा दिला. गुप्तपणे कामे करून घेणाऱ्या सतेज पाटलांनी त्यांची संपत्ती जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

Gokul Election : मुख्यमंत्र्यांनी नुसतं वटारलं तर तुमचं साम्राज्य एका दिवसात... चंद्रकांतदादांची सतेज पाटलांना थेट धमकी
chandrakant patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2026 | 4:06 PM
Share

गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशी धमकीच राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तुम्ही उठता बसता मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्र्यांवर टीका करता आणि अंधारात जाऊन त्यांच्याकडून कामं करून घेता? तुम्ही तुमची उंची बघून राहा. मुख्यमंत्र्यांनी थोडं जरी वटारलं तर तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी उघड धमकीच चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात गोकुळच्या सभेतून हा इशारा दिला. बंटी पाटलांनी एखादवेळी हळूच जाऊन त्यांचा अध्यक्ष केला असता तर काही वाटलं नसतं. पण तुम्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलता? त्यांच्याकडून अंधारात जाऊन कामं करून घेता आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांविरोधात बोलता? या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी नुसतं वटारलं तर तुमचं साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल. त्यांनी शिक्षण मंत्री या नात्याने मला फक्त आदेश दिला तर तुमचं काहीच शिल्लक राहणार नाही, अशी धमकीच चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हिंमत असेल तर…

एवढी धमक आहे तर मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये जाऊ नका. त्यांच्याकडे कामं घेऊन जाऊ नका. हिंमत आहे ना तुमच्यात? मग राहुल गांधींकडून कामं करून घ्या. मुख्यमंत्र्यांकडे कशाला जाता? ही जमीन द्या, ती जमीन द्या… हे द्या… ते द्या.. मागत राहता आणि लेव्हल सोडून बोलता? ते खाली पडले तुम्ही छाताडावर बसता. तेल लावलेला पहिलवान आहेत फडणवीस. भल्या भल्यांना ते सापडले नाहीत. भल्या भल्यांनी त्यांना घरी पाठवण्याचा प्रयत्न केला. त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. ते कुणाला घाबरत नाहीत. गोकुळवर अनेकजण बोलले. पण नागपूरमध्ये ते एकदाच बोलले आणि सर्वांना गप्प केलं. मुंगी होऊन साखर खायची असते. जास्त आरडाओरड केला ना तर, कधी तुमची जागा कधी दाखवली जाईल हे कळणार सुद्धा नाही, असा इशाराही चंद्रकांतदादांनी दिला.

तुमची प्रॉपर्टी जाहीर करा

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांना दगडं मारायची नसतात. तुमचे वडील डी वाय पाटील या शहरात स्कूटरवरून फिरत होते. आता तुमची प्रॉपर्टी किती आहे, ती डिक्लेअर करा बघू. ती कुठून आली? सव्वा पाच लाख दूध उत्पादक त्यांना मलाई काढण्यासाठी हवे आहेत. अनेकजण म्हणाले, त्यांना त्याचा डी वाय पाटील संघ करायचा आहे. जिवंत होते तोपर्यंत डी वाय पाटील. आता बंटी पाटील नावाने तुम्हाला गोकुळ करायचे आहे. तुम्हाला कुटुंबात इतरांपेक्षा जास्त श्रीमंत व्हायचं स्वप्न पडलं आहे. मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडलं आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

Follow Us
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!