पा पा पा पपप…तिर्रर… मनोज जरांगे बाहुबली स्टाईल कडाडले; बावनकुळेंची उडवली खिल्ली

मनोज जरांगे पाटलांनी सोलापुरात चंद्रशेखर बावनकुळेंची 'बाहुबली' स्टाईलमध्ये खिल्ली उडवली. त्यांनी बावनकुळे, फडणवीस आणि शिंदे यांच्यावर मराठा समाजाच्या विरोधात काम केल्याचा आरोप करत तीव्र शब्दांत टीका केली. मराठा आरक्षणासाठी जीव पणाला लावून लढत असल्याचे सांगत, त्यांनी समाजाला एकजुटीने राहण्याचे आवाहन केले.

पा पा पा पपप...तिर्रर... मनोज जरांगे बाहुबली स्टाईल कडाडले; बावनकुळेंची उडवली खिल्ली
manoj jarange
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 13, 2026 | 1:24 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बाहुबली सिनेमातील कल्की स्टाईलने खिल्ली उडवली आहे. त्यांनी बाहुबलीतील संवाद भरसभेत बोलून दाखवला आणि बावनकुळेंचा गंभीर इशारा दिला. आआथातू अरअरअर… अरअरअर पा पा पा पपप पा तिरर्रे… असा कलकीची डायलॉगबाजी मनोज जरांगे यांनी केली. जरांगे यांनी अनपेक्षितपणे नक्कल केल्याने सर्वांनाच सुखद धक्का बसला. जरांगे यांच्या या डायलॉगवर सर्वांनी एकच टाळ्या वाजवून दाद दिली. जरांगे यांच्या या अॅक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे.

मनोज जरांगे पाटील हे सोलापुरातील तांदूळवाडीत आले होते. यावेळी मराठा समाजाला संबोधित करत असताना त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. बावनकुळ्या अरे बाप मराठ्याचं वाटोळं करतो हा प्राणी. तुम्ही तो बाहुबली पिक्चर बघितला का? त्यात एक कलकी आहे. त्याचा एक डायलॉग आहे. आआथातू अरअरअर… अरअरअर पा पा पा पपप पा तिरर्रे… असा डायलॉगच मनोज जरांगे पाटील यांनी भर सभेत म्हटला. त्यामुळे उपस्थितांनी टाळ्या वाजवून जरांगे यांना प्रचंड दाद दिली. सोपं नाही बाबा बावनकुळे. तुम्ही लय अन्याय केलाय आमच्या मराठ्यांवर लेकरांवर, असं जरांगे म्हणाले.

कोण फडणवीस? कोण शिंदे?

बावनकुळे आमच्या तोंडातला घास घालतो का? शहाणा होय? आम्ही मारायला घाबरणारी औलाद नाहीये. आम्हाला खूप संघर्ष करावा लागतोय. हरामखोरांनो तुम्हाला आम्ही एसीमध्ये बसवले. कोण फडणवीस?कोण शिंदे? तुम्हांला मोठं करून आम्ही काही चूक केली का? आमच स्वप्न का पूर्ण होऊ देत नही, इतके वैरी का झाले? आमच्या संसाराची राख रांगोळी होत आहे. आमचे स्वप्न धुळीस मिळत आहे. आमच्यावर अन्याय करण्याचा अधिकारी कुणी दिला?, असा सवालही त्यांनी केला.

वाटोळं पाहता का?

मराठ्यांच्या नेत्यांच्या नाकावर टिचून त्याने नोंदी रद्द केल्या. गप्प बसून डोळ्या देखत वाटोळं पाहता का? जर समाज बाजूला सरकला तर तुम्हाला जगू देणार नाही. आज शिंदे साहेबाचे काय हाल आहे? सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मी स्वतःच्या जीवाची बाजी लावून लढतोय. मारायला सुद्धा भीत नाहीये. मी असेल, नसेल तेव्हा तुमच्या खांद्यावर जबाबदारी खांद्यावर घायवी लागेल. मी आहे तोपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

आमच्या विरोधात पोस्ट टाकायला सांगता…

देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या विरोधात पोस्ट टाकायला सांगतात. हे तुम्हाला शोभतं का? अन् माझ्याकडून तुम्ही कोणत्या सन्मानाची अपेक्षा करता. इथे मराठे बाप आहे,आणि मराठेच बाप राहणार आहेत. क्षत्रिय मराठ्यांच्या नादला लागायचं बंद करा. मराठ्यांच्या विरोधात लढायच्या आणि डाव टाकायच्या भानगडीत पडू नका, असा इशाराच जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

मी मरायला तयार

समाज कधीच उघडा पडू देऊ नका. यांनी सगळ्यांनी मिळून आपल्या समाजातील लेकरांचा वनवास करायचं ठरविले आहे. पक्ष आणि नेता आपला बाप नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. समाज संकटात असेल तर वाटेल ती किंमत मोजायची वेळ आली तर चालेल, ज्या दिवशी समाज संकटात असेल तेव्हा पक्षाला लाथ मारा, सरकार हे जाणूनबुजून करत आहे. मी कधीही जीव द्यायला तयार आहे. कधीही मारायला तयार आहे, तुम्ही कधीही एकजूट असू द्या, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us