Pune Fire | आठ महिन्यांत पुण्यात भीषण आगीच्या अनेक घटना, मृतांची संख्या…कोट्यावधी रुपयांचे नुकसान

Pune Fire : पुणे शहर आणि परिसरात एक, दोन महिन्याच्या कालावधीत भीषण आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांत लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच लाख मोलांचे जीव गमावले आहे. वाढत्या आगीच्या घटनेनंतर प्रशासनाकडून काहीच उपाययोजना होताना दिसत नाही.

Pune Fire | आठ महिन्यांत पुण्यात भीषण आगीच्या अनेक घटना, मृतांची संख्या...कोट्यावधी रुपयांचे नुकसान
पुणे तळवडे येथे फटाका गोदामाला आगImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 5:04 PM

रणजित जाधव, पुणे | 8 डिसेंबर 2023 : पुणे शहरात गेल्या आठ महिन्यांपासून एकामागे एक आगीचे सत्र सुरु आहे. शहर आणि परिसरात एक, दोन महिन्याच्या कालावधीत भीषण आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये भीषण आग लागली. या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. या भागात वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या मेणबत्त्या आणि फटाक्याचे गोदाम होते. त्या गोदामाला ही आग लागली. या गोदामात सगळ्या ज्वलनशील वस्तू असल्यामुळे आग वेगाने पसरली. काही कळण्याच्या आत आगीने संपूर्ण गोदाम व्यापले. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या कामगारांना निघण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यात सात जणांचा मृत्यू झाला. अजूनही काही कामगार अडकल्याची शक्यता आहे.

अनेक प्रश्नांची उत्तर शोधावी लागणार

पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथे फटाका गोदाम आहे. शुक्रवारी दुपारी या गोदामाला आग लागली. या गोदामाला परवाना होता का? त्या ठिकाणी ज्वलनशीर वस्तू असताना सुरक्षेची काळजी घेतली गेली होती का? सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? हे प्रश्न निर्माण झाले आहे. परंतु पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अनेक वेळा आग लागत आहे. यासंदर्भात काहीच उपाययोजना होत नाही. या आगीत मृतांची संख्या मोठी आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान गेल्या आठ महिन्यांत झाले आहे.

पुणे शहरात घडलेल्या आगीच्या घटना

  • पुणे शहरातील वाघोलीत येथील गोडाऊनमध्ये चार सिलेंडर फुटले होते. मे महिन्यात महिन्यात लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला होता.
  • जून महिन्यात मार्केट यार्डमधील हॉटेल रेवळ सिद्धी येथे लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला. जून महिन्यातच पुण्यातील टिंबर मार्केटमध्येही आग लागली होती. त्या आगीत प्रचंड नुकसान झाले होते.
  • पुन्हा जुलै महिन्यात कोंढवा येवलेवाडी येथील गोडाऊनला भीषण आग लागली.
  • ऑगस्ट महिन्यात पिंपरी चिंचवडमधील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात आग लागली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला.
  • ऑक्टोंबर महिन्यात गाडयांच्या शोरुमला आग लागली होती. त्या आगीत २५ मोटारसायकल जळून खाक झाल्या.
  • पुण्यातील वेस्टलँड मॉलला रेस्टॉरंटमध्ये २३ नोव्हेंबर रोजी आग लागली. यावेळी मॉलमध्ये असणाऱ्या सात हजार लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.