Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क मॅनची दहशत! भर दिवसा हातात चाकू घेऊन फिरला अन्…

पिंपरी चिंचवड शहरात मास्क मॅनची दहशत सध्या पाहायला मिळत आहे. हा मास्क मॅन दिवसा उजेडी भर रस्त्यात हातात चाकू घेऊन फिरत होता. आता नेमकं प्रकरण काय चला जाणून घेऊया...

Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क मॅनची दहशत! भर दिवसा हातात चाकू घेऊन फिरला अन्...
Pune Crime (File Photo)
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 22, 2025 | 12:47 PM

पुण्यातील गुन्ह्यांचे आणि पर्यायाने दहशतीचे वातावरण वाढतच असून विद्येचे माहेरघर असलेले हे शहर आता एक नवी, क्रूर ओळखं मिळवतंय की काय अशा घटना एकापाठोपाठ एक घडतच आहेत. कधी स्वारगेट बस अत्याचार, तर कधी ड्रिंक अँड ड्राईव्ह करत निष्पापांना उडवणं असो किंवा तरूणांची नशेत अश्लील कृत्य असोत. पुण्याचं नाव दिवसेंदिवस बदनाम होत चाललंय. हेच कमी की काय म्हणू भरदिवसा हल्ले, मारमारी, खूनही होत आहेतच. नुकताच पिंपरी चिंचवडमध्ये एका मास्क मॅनची दहशत पाहायला मिळाली.

पिंपरी चिंचवडमध्ये एका मास्क मॅनची दहशत पाहायला मिळाली. हा मास्क मॅन दिवसाउजेडी पिंपरी चिंचवड येथे हातात चाकू घेऊन फिरताना दिसला. शहरातील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी या मास्क मॅनने धारधार चाकू हातात घेतला आहे.

वाचा: मुंबईचा बिअर मॅन! तो यायचा, हत्या करायचा अन्… कहाणी त्या सनकीची ज्याला रक्त आवडायचे

धारधार चाकू घेऊन वावर

पिंपरी चिंचवड शहरात मास्क मॅन ची दहशत पाहायला मिळत आहे. भर रस्त्यात , भर दिवसा हातात धारदार चाकू घेऊन मास्क मॅन शहरात वावरताना पाहायला मिळत आहे. निगडी येथील बजाज ऑटोमोबाईल समोरील एचपी पेट्रोल पंपाजवळ काही वेळापूर्वी मास्क मॅन हातात धारदार चाकू घेऊन रस्ता क्रॉस करत असताना दिसत आहे. त्याने कोणाला मारण्यासाठी हा चाकू हातात घेतला आहे की लोकांना दहशत निर्माण करण्यासाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ओळख लपवण्याचा प्रयत्न

मास्क मॅन गुन्हेगाराने चेहऱ्यावर मास्क घालून आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हातात धारदार चाकू घेऊन वावरत असल्याने रस्त्या वरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये मास्क मॅनची मोठी दहशत निर्माण झाली आहे.आता या हातात चाकू घेऊन पिंपरी चिंचवड शहरात वावरणाऱ्या मास्क मॅन च्या मुसक्या पिंपरी चिंचवड पोलीस कधी आवळणार. याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

यापूर्वी मे महिन्यात पुण्यात कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली होती. ही टोळी हातात कोयता घेऊन भर दिवसा वार करायची. रात्रीच्या वेळी, भररस्त्यात वेगाने, वाहनांची वर्दळ सुरू असतानाच, काही तरूणांचा एकमेकांशी वाद झाला, राडा झाला आणि त्यातील काही लोकांनी एकमेकांवर कोयत्याने सपासव वार करत जीवघेणा हल्लाच होता. या घटनेच्या चार आरोपींना अटक झाली होती. आता पिंपरी-चिंचवड येथे मास्क मॅनची दहशत पाहायला मिळतेय.