Pune Metro : पुण्याच्या खडकीतही लवकरच उभे राहणार मेट्रोचे खांब; मिळणार जागेचा ताबा

पुणे मेट्रोच्या (Pune Metro) उर्वरित मार्गांची पुणेकर उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्यात आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. हॅरिस पुलालगतचा (Harris Bridge) मेट्रो मार्ग जवळपास तयार झाला आहे.

Pune Metro : पुण्याच्या खडकीतही लवकरच उभे राहणार मेट्रोचे खांब; मिळणार जागेचा ताबा
पुणे मेट्रोचे काम (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 7:30 AM

पुणे : पुणे मेट्रोच्या (Pune Metro) उर्वरित मार्गांची पुणेकर उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्यात आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. हॅरिस पुलालगतचा (Harris Bridge) मेट्रो मार्ग जवळपास तयार झाला आहे. खडकीतील (Khadki) उर्वरित मार्गावरील खांब उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचा ताबा येत्या काही दिवसात मिळणार आहे. त्यामुळे काम सुरू करण्यात येणार असल्याचे महामेट्रोने म्हटले आहे. महामेट्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले, की जमिनीसंबंधीच्या काही औपचारिक बाबी बाकी असल्याने काम संथगतीने सुरू आहे. जमीन ताब्यात घेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडील सर्व औपचारिकता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. जमीन हस्तांतरित केल्याने मेट्रोचे आठ खांब उभारण्याचा मार्ग मोकळा होईल. खडकी भागातील उर्वरित मार्गावरील मेट्रोच्या कामालाही गती देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गर्डरचे काम पूर्ण

आम्ही नुकतेच रेंज हिल्सच्या दिशेने व्हायाडक्ट भाग वाढवण्यासाठी रेल्वे ट्रॅक ओलांडण्यासाठी गर्डरचे काम पूर्ण केले. बोपोडी आणि खडकी या दोन मेट्रो स्थानकांचे कामही हाती घेण्यात आले आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बहुतांश खांब येत्या काही दिवसांत तयार होणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हॅरिस ब्रिज येथील महत्त्वाच्या पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात

महामेट्रोने गेल्या महिन्यात PCMC ते फुगेवाडी हा भाग व्यावसायिक तत्त्वावर कार्यान्वित केला. फुगेवाडी-बोपोडी-खडकी-रेंज हिल्स-अॅग्रिकल्चर कॉलेज हा भाग प्राधान्याने कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आता निश्चित करण्यात आले आहे. महामेट्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की आम्हाला हे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे. हॅरिस ब्रिज येथील महत्त्वाच्या पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. दोन रस्त्यांच्या पुलांदरम्यान मेट्रो मार्ग तयार करण्यात आला आहे. दोन्ही पुलांवरील खांबांमुळे वाहनांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.

भूमिगत मार्ग

मेट्रो मार्ग रेंज हिल्सपर्यंत पोहोचल्यानंतर कृषी महाविद्यालयाच्या दिशेने भूमिगत होईल. व्हायाडक्टची उंची हळूहळू कमी होत जाईल आणि कृषी महाविद्यालयात मेट्रो मार्ग बोगद्यामध्ये भूमिगत होईल. दिवाणी न्यायालयापर्यंत बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचे महामेट्रोने म्हटले आहे. ट्रॅक टाकण्याचे आणि ओव्हरहेड ट्रॅक्शनचे कामही लवकरच सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली.

आणखी वाचा :

Kolhapur North By Election 2022 : चंद्रकांतदादांनी खरोखरच हिमालयात जावं, मीही सोबत येईल; जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

Kolhapur By Election Result 2022 : कोल्हापूर पोटनिवडणुकीत महात्मा गांधींची नोट चालली, पुण्यात राजू शेट्टींचा हल्लाबोल

Kashmir Files Actor : पुण्यात आशिष शेलारांना ‘फारुख मलिक बिट्टाची’ भीती; चिन्मय मांडलेकरला म्हणाले, …तर माझं काय होईल?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.