भिडे गुरुजींची उंची हिमालयासारखी, शरद पवार म्हणजे फर्ग्युसनची टेकडी!; कुणी डागलं टीकास्त्र?

Milind Ekbote on Sharad Pawar Statement : शरद पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना संभाजी भिडे यांच्याबाबत एक विधान केलं होतं. त्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. आता त्याच विधानावरून शरद पवारांवर टीका करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...

भिडे गुरुजींची उंची हिमालयासारखी, शरद पवार म्हणजे फर्ग्युसनची टेकडी!; कुणी डागलं टीकास्त्र?
शरद पवार, संभाजी भिडे
Image Credit source: Facebook
| Updated on: Aug 26, 2024 | 3:28 PM

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. संभाजी भिडे यांनी अप्रत्यक्षपणे मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, असं संभाजी भिडे म्हणाले होते. त्यांच्या या विधानाबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. संभाजी भिडे हे काय कमेंट करण्याच्या लायकीचे आहेत का? काहीही प्रश्न विचारतात, असं म्हणत पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांनी थेट निशाणा साधला होता. त्यावर हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे गुरुजींची लायकी, त्यांची श्रेष्ठता ही महान आहे. भिडे गुरुजी यांची उंची हिमालयासारखी आहे. तर शरद पवार म्हणजे फर्ग्युसनची टेकडी आहेत, असं मिलिंद एकबोटे म्हणालेत.

मिलिंद एकबोटे काय म्हणाले?

पुण्यातील भोरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान मिलिंद एकबोटे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना लायकी शब्द वापरत संभाजी भिडे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या याच विधानावर मिलिंद एकबोटे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. भिडे गुरुजींची लायकी, श्रेष्ठता ही महान आहे, भिडे गुरुजी यांची उंची हिमालयासारखी तर शरद पवार म्हणजे फर्ग्युसनची टेकडी आहे, असं मिलिंद एकबोटे म्हणालेत. महिलांच्या सुरक्षेततेसाठी सरकारने लाडकी बहीण सारखी सुरक्षित बहीण योजना काढवी, असंही एकबोटे म्हणालेत.

बांग्लादेशमध्ये हिंदूवर झालेल्या अत्याचारामुळे त्यांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या. त्याच्या विरोधात भारतातला हिंदू संतप्त झालेला आहे. भारतातली मिलिट्री बांग्लादेशमध्ये घुसली पाहिजे आणि त्याठिकाणच्या हिंदूंना संरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणीही मिलिंद एकबोटे यांनी केली आहे.

महिला सुरक्षेवर भाष्य

महिलांच्या सुरक्षेततेसाठी सरकारनी लाडकी बहीण सारखी सुरक्षित बहीण योजना काढवी. माता भगिनीवर अन्याय अत्याचार झाला. तर झिरो टॉलरन्स ह्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे. पोलिसांकडून समाधान कारक कामं घडलं नाही. म्हणून आज ही परिस्थिती आली आहे, असं मिलिंद एकबोटे म्हणाले.