Madhuri Misal : पुण्यातही काही कट्टर प्रवृत्तीचे घटक..बकऱ्याच्या कुर्बानीवरुन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं पोलिसांना पत्र
Madhuri Misal : धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांशी गैरवर्तन व अश्लील वर्तनाच्या घटना वाढत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची केली मागणी.

मीरारोडच्या घटनेचा संदर्भ देत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते, पोलिस आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्त यांना पत्र लिहिलं आहे. “मीरा-भाईंदर परिसरात निवासी सोसाट्यांमध्ये सार्वजनिक स्वरुपात बकरे आणून धार्मिक कारणास्त्व पशुबळी देण्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशा प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थतता निर्माण होऊन सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातही काही समाजविघातक, कट्टर प्रवृत्तीचे घटक सार्वजनिक ठिकाणी सोसायट्यांमध्ये किंवा रहिवाशी भागांमध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता, आरोग्याचे निकष न पाळता सार्वजनिक ठिकाणी असे कार्यक्रम घेणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे” असं माधुरी मिसाळ यांनी पत्रात लिहिलं आहे.
“पुणे हे शैक्षणिक, सांस्कृतीक आणि सामाजिक सलोखा जपणारे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अशा प्रकारे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळीच प्रतिबंधात्मक उपायोजना करणं गरजेचं आहे” असं माधुरी मिसाळ यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. पुण्यातील सार्वजनिक ठिकाणी आणि सोहळ्यांमध्ये अनुचित कृत्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याबाबत पत्रातून चिंता व्यक्त केली.
हे देवाभाऊंचं सरकार असून इथे कायद्याचं राज्य आहे आणि कायदा सगळ्यांसाठी समान आहे.
.
.
.@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @DGPMaharashtra @AmiteshKumar72 #maharashtra #devendrafadanvis #madhurimisal #pune #mumbai #bjp pic.twitter.com/TmVQSbeF0z— Madhuri Misal (@madhurimisal) May 27, 2026
धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांशी गैरवर्तन
धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांशी गैरवर्तन व अश्लील वर्तनाच्या घटना वाढत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची केली मागणी. महिलांशी छेडछाड, अश्लील कृत्ये आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. पुणे पोलिस, महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी केली मागणी.