AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Misal : पुण्यातही काही कट्टर प्रवृत्तीचे घटक..बकऱ्याच्या कुर्बानीवरुन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं पोलिसांना पत्र

Madhuri Misal : धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांशी गैरवर्तन व अश्लील वर्तनाच्या घटना वाढत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची केली मागणी.

Madhuri Misal : पुण्यातही काही कट्टर प्रवृत्तीचे घटक..बकऱ्याच्या कुर्बानीवरुन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं पोलिसांना पत्र
Madhuri Misal
| Updated on: May 27, 2026 | 12:32 PM
Share

मीरारोडच्या घटनेचा संदर्भ देत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते, पोलिस आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्त यांना पत्र लिहिलं आहे. “मीरा-भाईंदर परिसरात निवासी सोसाट्यांमध्ये सार्वजनिक स्वरुपात बकरे आणून धार्मिक कारणास्त्व पशुबळी देण्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशा प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थतता निर्माण होऊन सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातही काही समाजविघातक, कट्टर प्रवृत्तीचे घटक सार्वजनिक ठिकाणी सोसायट्यांमध्ये किंवा रहिवाशी भागांमध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता, आरोग्याचे निकष न पाळता सार्वजनिक ठिकाणी असे कार्यक्रम घेणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे” असं माधुरी मिसाळ यांनी पत्रात लिहिलं आहे.

पुणे हे शैक्षणिक, सांस्कृतीक आणि सामाजिक सलोखा जपणारे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अशा प्रकारे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळीच प्रतिबंधात्मक उपायोजना करणं गरजेचं आहे” असं माधुरी मिसाळ यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. पुण्यातील सार्वजनिक ठिकाणी आणि सोहळ्यांमध्ये अनुचित कृत्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याबाबत पत्रातून चिंता व्यक्त केली.

धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांशी गैरवर्तन

धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांशी गैरवर्तन व अश्लील वर्तनाच्या घटना वाढत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची केली मागणी. महिलांशी छेडछाड, अश्लील कृत्ये आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. पुणे पोलिस, महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी केली मागणी.

Follow Us
भाजपचा फॉर्म्युला शिंदेंनी फेटाळला?; जागावाटपावरून शिंदे दिल्ली दरबारी
भाजपचा फॉर्म्युला शिंदेंनी फेटाळला?; जागावाटपावरून शिंदे दिल्ली दरबारी.
अर्थखात्यावरुन महायुतीतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, सुनेत्रा पवार नाराज
अर्थखात्यावरुन महायुतीतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, सुनेत्रा पवार नाराज.
अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले शरद पवार; नेमकं कारण काय?
अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले शरद पवार; नेमकं कारण काय?.
NEET प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं नवं कांड! त्या व्यक्तीचा नंबर थेट 'God'..
NEET प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं नवं कांड! त्या व्यक्तीचा नंबर थेट 'God'...
देश हादरवणाऱ्या NEET पेपरफुटीत नवा स्फोट; सीबीआयकडून आणखी दोघांना अटक
देश हादरवणाऱ्या NEET पेपरफुटीत नवा स्फोट; सीबीआयकडून आणखी दोघांना अटक.
एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, हे नेमकं...
एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, हे नेमकं....
लवकर आटपा बोलणं झोंबलं... भुजबळ- तटकरेंची सुनेत्रा वहिनींसमोरच जुंपली
लवकर आटपा बोलणं झोंबलं... भुजबळ- तटकरेंची सुनेत्रा वहिनींसमोरच जुंपली.
ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा
ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा.
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....