ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा, कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. विधान परिषदेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच शिवसेना शिंदे गटात इच्छुकांनी तिकीटासाठी जोरदार लॉबिंग सुरू केल्याची चर्चा रंगली आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. विधान परिषदेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच शिवसेना शिंदे गटात इच्छुकांनी तिकीटासाठी जोरदार लॉबिंग सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेने किमान पाच जागांवर दावा केला असून सहावी जागा ‘मेरिट’ आणि राजकीय समीकरणांच्या आधारावर मिळावी, अशी मागणी पक्षांतर्गत पुढे येत आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर किंवा रायगड यांपैकी एका मतदारसंघावर शिवसेना आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणीही सुरू झाली असून अनेक नावांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाणे-पालघर या महत्त्वाच्या मतदारसंघातून माजी आमदार रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच त्यांच्या उमेदवारीची घोषणा करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिंगोली-परभणी मतदारसंघासाठी माजी मंत्री अभिमन्यू खोतकर आणि विप्लव बजोरिया यांची नावं चर्चेत आहेत. तर छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघासाठी राजेंद्र जंचाळ आणि बाजीराव चव्हाण यांच्यात स्पर्धा असल्याचं सांगितलं जात आहे. नाशिकमधून माजी खासदार हेमंत गोडसे, सईद खान आणि भाऊसाहेब चौधरी यांची नावं चर्चेत आहेत. रायगडमधून भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचं नाव पुढे येत असून जळगावमधून मंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील यांच्या नावाचीही चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Published on: May 27, 2026 09:55 AM
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...

