AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLA Lakshman Jagtap : आमदार लक्ष्मण जगताप यांना डिस्चार्ज, कार्यकर्त्यांनी फोडले फटाके

ते रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यानंतर राज्यभरातून सर्वपक्षीय नेत्यांसह शहरातील कार्याकर्ते, पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. कुटुंबीयांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली जात होती.

MLA Lakshman Jagtap : आमदार लक्ष्मण जगताप यांना डिस्चार्ज, कार्यकर्त्यांनी फोडले फटाके
आमदार लक्ष्मण जगताप यांना डिस्चार्ज, कार्यकर्त्यांनी फोडले फटाकेImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 02, 2022 | 4:49 PM
Share

पिंपरी चिंचवड : शहरातील भाजपचे (BJP) चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय त्यांचावर गेल्या 40 दिवसापासून पुण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आलाय. आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालतून सोडण्यात आल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करत फटाके फोडलेत, ते रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यानंतर राज्यभरातून सर्वपक्षीय नेत्यांसह शहरातील कार्याकर्ते, पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. कुटुंबीयांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली जात होती. माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीताई पवार, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष्मण जगताप यांच्यासाठी जे महागडं इंजेक्शन विदेशातून आणण्यासाठी मोठी मदत देखील केली होती.

महापालिका निवडणुकीत ताकद वाढली

पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात आमदार लक्ष्मण जगताप यांचा मोठा दरारा आहे. शहरातील पॉवरफुल नेतृत्व म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. आगामी महापालिका निवडणुकीत आमदार जगताप यांनी भूमिका महत्वाची राहणार आहे. लक्ष्मण जगतापांना तब्बल 40 दिवसांनी दिवसांनी डिस्चार्ज मिळालाय. सध्या त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. पण लवकरच ते राजकारणात पुन्हा सक्रिय होणार आहेत. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जगताप भाजपसाठी महत्वाची भूमिका बजावणार आहेत. 2017 साली जगताप आणि भाजप आमदार महेश लांडगे या जोडगोळीनेच सत्तांतर केलं. राष्ट्रवादीच्या हातातून बालेकिल्ला काबीज केला, तो अबाधित ठेवायचा असेल तर जगताप राजकारणात लवकरात लवकर सक्रिय होण भाजपच्या दृष्टीने फायद्याचं ठरणार आहे.

सर्वपक्षीय नेत्यांनी केलेली विचारपूस

आमदार जगताप रुग्णालयात उपचार घेत असताना अनेक दिग्गज नेत्यांनी भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेस, भाजाप,शिवसेनेच्या नेत्यांनी भेट घेतली त्यामध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार,भाजपतील नेते प्रविण दरेकर, रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले, नारायण राणे, नीलेश राणे, विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन देसाई, भाई जगताप, माधुरी मिसाळ, गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, बापू पठारे, चंद्रकांत मोकाटे, आमदार अण्णा बनसोडे, जगदीश मुळिक, भिमराव तापकीर, आझमभाई पानसरे, संजय जगताप, सिनेअभिनेते प्रविण तरडे यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांची रुग्णालयात येऊन विचारपूस केली होती.

सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.