Pune MNS Maha aarti : पुण्याच्या खालकर चौकातल्या मारुती स्तोत्रानंतर मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, पुण्येश्वर मंदिरात महाआरती होणार?

| Updated on: May 04, 2022 | 12:30 PM

पुण्येश्वर मंदिराशेजारीच मशीद आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. याठिकाणी महाआरती करू नये, असे पोलिसांनी सांगितले होते. दरम्यान, पुण्येश्वर मंदिराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Pune MNS Maha aarti : पुण्याच्या खालकर चौकातल्या मारुती स्तोत्रानंतर मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, पुण्येश्वर मंदिरात महाआरती होणार?
खालकर चौकात मनसेतर्फे महाआरती, मारुती स्तोत्रपठन
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुण्यातील खालकर चौकात मनसेतर्फे (MNS) महाआरती करण्यात आली आहे. मनसे नेते अजय शिंदे यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या आरतीनंतर पुण्येश्वर मंदिरात मनसेतर्फे महाआरती करण्यात येणार आहे, असे अजय शिंदे (Ajay Shinde) यांनी सांगितले आहे. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्येश्वर मंदिराशेजारीच मशीद आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. याठिकाणी महाआरती करू नये, असे पोलिसांनी सांगितले होते. दरम्यान, पुण्येश्वर मंदिराजवळ मोठा पोलीस (Police) बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान पोलीस त्यांचे काम करतील. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही महाआरती करणार असल्याचे शिंदे म्हणाले. पुणे शहर हिंदुत्वाच्या विचारांनी प्रभावित व्हावे, असे शिंदे म्हणाले.

मारुती स्तोत्र म्हणताना अजय शिंदे

या मंदिराचा इतिहास काय?

संत नामदेव यांच्या गाथेमध्ये उल्लेखलेले आणि पुणे शहराचे नाव ज्यावरून पडले अस पुण्येश्वर महादेवाचे मंदिर आहे.  इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम करताना धाकटा शेख सल्ला दर्ग्याच्या परिसरात पुरातन पुण्येश्वर मंदिराचे अवशेष सापडले आहेत.  या जागेत पूर्वी यादवांच्या काळातले पुण्येश्वर मंदिर होते हे सर्वज्ञात आहे. अशी या मंदिराची ख्याती आहे. त्यामुळे या मंदिराला आणि या परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे. मात्र याच मंदिरात आरतीचा इशारा मनसेने दिल्याने तणाव वाढला आहे. त्यामुळे पोलीस कडेकोट पहारा देत आहेत. तणाव न होण्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना पुण्येश्वर मंदिरात महाआरती न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र मनसे ठाम आहे. सध्यातरी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

राज ठाकरेंच्या अटकेच्या चर्चेवरून मनसेचा इशारा

तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबाद पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने राज ठाकरे यांना अटक होऊ शकते अशा चर्चा सुरू आहे. अशात पुणे मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर आणि त्यांनी इशारा देत केलेले ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे.

मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

पुण्यात खालकर चौकातील महाआरतीनंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. पुण्येश्वर मंदिरात हे कार्यकर्ते महाआरतीसाठी जात होते. मात्र कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून खबरदारीचा उपाय पोलिसांनी अवलंबला आहे.