AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC जुन्या अभ्यासक्रमास आता शेवटची संधी, जागा कमी असल्याने विद्यार्थी आक्रमक

MPSC Exam | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग केला आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेची शेवटी संधी असताना कमी जागांची जाहिरात काढली आहे. आयोगाकडून एकूण ३२ संवर्गासाठी परीक्षा घेतल्या जातात. परंतु आता काढलेल्या जाहिरातीत केवळ १२ संवर्ग दिले आहेत.

MPSC जुन्या अभ्यासक्रमास आता शेवटची संधी, जागा कमी असल्याने विद्यार्थी आक्रमक
mpscImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 30, 2023 | 9:10 AM
Share

पुणे, दि. 30 डिसेंबर 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षा वेळापत्रक आले आहे. एमपीएससीचा रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमांसाठी ही शेवटची संधी आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर जागा निघतील अशी अपेक्षा होती. एमपीएससीची परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी असताना आता आयोगाने केवळ २०५ जागांसाठी जाहिरात काढली आहे. जुन्या परीक्षानुसार ही शेवटची संधी असल्यामुळे तीव्र स्पर्धा होणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे एमपीएससी परीक्षा देणारे लाखो विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नवा अभ्यासक्रम २०२५ पासून

एमपीएससीने नवा अभ्यासक्रम लागू केला होता. परंतु वर्षानुवर्ष विद्यार्थी जुन्या अभ्यासक्रमाने अभ्यास करत होते. अचानक नवीन अभ्यासक्रम लागू केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी पुणे शहरातून आंदोलन सुरु केले. २०२३ च्या सुरुवातीला झालेल्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनास आमदार रोहित पवार यांनी पाठबळ दिले. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थी हिताचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम लागू केला. नवा अभ्यासक्रम लागू होण्यापूर्वी एसपीएससीने जुन्या अभ्यासक्रमाच्या आधारे जास्त संधी देण्याची अपेक्षा असताना २०२४ च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी केवळ २०५ जागा काढण्यात आल्या आहेत.

३२ संवर्गांपैकी केवळ १२ संवर्गांचा परीक्षा

आयोगाकडून एकूण ३२ संवर्गासाठी परीक्षा घेतल्या जातात. परंतु आता काढलेल्या जाहिरातीत केवळ १२ संवर्ग दिले आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलिस उपाधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक या महत्त्वाची पदेच नाहीत. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे.

असे आहे राज्यसेवा परीक्षेचे वेळापत्रक

  • सामान्य प्रशासन विभागातील २०५ पदांसाठी परीक्षा १४ ते १६ डिसेंबर २०२४ दरम्यान होणार आहे.
  • राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सेवा विभागातील २६ पदांसाठी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी परीक्षा होणार आहे.
  • राज्यसेवेच्या वनसेवा महसूल व वनविभागसाठी ४३ पदे आहेत. ही परीक्षा २८ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्या होणार आहे.
Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय