पुण्यात 109 केंद्रावर MPSCपरीक्षेची तयारी, 4 हजार कर्मचाऱ्यांची RTPCR टेस्ट

एमपीएसी परीक्षेच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. MPSC Secondary Service Group B Exam

पुण्यात 109 केंद्रावर MPSCपरीक्षेची तयारी, 4 हजार कर्मचाऱ्यांची RTPCR टेस्ट
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 3:43 PM

पुणे: राज्यात वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता 11 एप्रिलची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, अखेर एमपीएससीनं परिपत्रक जारी करत परीक्षा वेळेतचं होणार हे स्पष्ट केलंय. राज्यातील विविध जिल्ह्यात आता प्रशासनानं तयारी करायला सुरुवात केली आहे. परीक्षेच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. (MPSC Secondary Service Group B Exam held on 11 April 109 exam centres declared for Pune)

महाराष्ट्रातून 4 लाख उमेदवार परीक्षा देणार

कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने सगळ्या उपाययोजना करण्याच्या सूचना या जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्यात. कारण राज्यात ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही तब्बल 4 लाखाच्या घरात आहे. आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून कोरोना संदर्भातील उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक आणि कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आरटीपीसीआर टेस्ट ही बंधनकारक करण्यात आली.

पुण्यात 109 परीक्षा केंद्र

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुणे शहरात येतात. पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण 109 परीक्षा केंद्रांवर परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. या केंद्रावरून 42 हजार 700 उमेदवार परीक्षा देणार आहेत. 4 हजार कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.

कोरोनाची भीती बाळगू नका, प्रशासनाचं आवाहन

दुय्यम सेवा गट ब परीक्षेला विद्यार्थ्यांनी सामोरं जावं कोरोना उपाययोजना केल्या जातील. विद्यार्थ्यांनी कोरोनाची भीती बाळगू नये, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

कोरोनाविषयक सर्व उपाययोजना करुन राज्यातील 36 जिल्ह्यांमधील विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे काही विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा तारखेवर शिक्कामोर्तब, 11 एप्रिलपासून परीक्षेला सुरुवात, पाहा परीक्षा कशी होणार?

SBI Apprentice परीक्षेला स्थगिती, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून नव्या तारखांची लवकरच घोषणा

MPSC परीक्षार्थींसाठी रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची मागणी, वाहतुकीसह वयोमर्यादेचा मुद्दा उपस्थित

(MPSC Secondary Service Group B Exam held on 11 April 109 exam centres declared for Pune)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.