आमचा विश्वास तुकाराम मुंढेंवर, पण सरकारवर नाही.. पुण्यातील MPSCचे विद्यार्थी असं का बोलले?

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील विवेकानंद पाटील यांच्या भाषणातील अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. त्यांनी आमचा विश्वास तुकाराम मुंढेंवर, पण सरकारवर नाही असे म्हटले आहे.

आमचा विश्वास तुकाराम मुंढेंवर, पण सरकारवर नाही.. पुण्यातील MPSCचे विद्यार्थी असं का बोलले?
MPSC Students
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 11, 2026 | 7:31 AM

पुण्यात गेल्या 10 दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे एस. एम. जोशी पुलाखाली आंदोलन सुरु आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली आहे. याच आंदोलनातून विवेकानंद पाटील हे नाव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. त्यांची आक्रमक भाषणशैली आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांसह अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आहे. आता त्यांनी आमचा विश्वास तुकाराम मुंढेंवर आहे, पण सरकारवर नाही.. असे वक्तव्य केले आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित मुद्द्यांवर बोलताना विवेकानंद पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, आमचा विश्वास तुकाराम मुंढे यांच्यावर आहे, सरकारवर नाही. पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट विनंती केली.

Loading...

“मुख्यमंत्री म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका. तुम्ही आमचे प्रश्न सोडवणार असाल तर विद्यार्थी म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. पेपर फुटी बाहेर येणार असतील तर आम्ही सर्व विद्यार्थी तुमचे कौतुक करू,” असे विवेकानंद पाटील यांनी आपल्या भाषणात ठासून सांगितले.

गेल्या दहा दिवसांपासून विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसून आंदोलन करावे लागत आहे, हे विद्यार्थ्यांचे दुर्दैव असल्याचेही त्यांनी नमूद केले. परीक्षा पद्धतीतील अनियमितता, पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अन्य प्रश्नांमुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आंदोलनावर टीका करणाऱ्यांबाबतही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “ज्यांनी ज्यांनी आमच्या आंदोलनावरती टीका केली, त्यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. हा आमचा नैतिक विजय आहे,” असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने समाजात आणि राजकीय वर्तुळातही चर्चा निर्माण झाली असून, टीका करणाऱ्यांनाही विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांची गांभीर्य समजू लागले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us