AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC विद्यार्थ्यांचे पुण्यात अचानक आंदोलन, पोलिसांची गुन्हे दाखल करण्याची तयारी

MPSC Student agitation: पुणे पोलीस आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे. आंदोलनासाठी परवानगी न घेता विद्यार्थी रस्त्यावर आले. तुमची मागणी संविधानिक मार्गाने मांडा रस्त्यावर बसून अडवू नका, असे पोलिसांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

MPSC विद्यार्थ्यांचे पुण्यात अचानक आंदोलन, पोलिसांची गुन्हे दाखल करण्याची तयारी
MPSCImage Credit source: TV 9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 27, 2025 | 7:58 PM
Share

MPSC Student agitation: पुणे शहरात शास्त्रीनगर येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. पुणे येथील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. परीक्षेतील जागा वाढवाव्यात, एमपीएससी वर्ग २ च्या जागांमध्ये वाढ करण्याची मागणी त्यांनी केली. पीएसआय पदांमध्ये वाढ करण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, या आंदोलनातही विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडल्याचे समोर आले. हे दोन्ही गट वेगवेगळ्या मागण्या करीत असून त्यांच्यात ताळमेळ नाही.

काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुख्य सहा मागण्यांसाठी आंदोलन केले. त्यात संयुक्त गट ब व क २०२४ परीक्षेच्या जागांमध्ये वाढ करण्याची मागणी आहे. तसेच एक्साईज एसआय पदांच्या जागा वाढवण्याची मागणी केली आहे. एसपीएस परीक्षांचे वेळापत्रक अनेकवेळा कोलमडते. यामुळे या सर्व परीक्षा वेळेवर झाल्या पाहिजे, ही मागणीसुद्धा विद्यार्थ्यांनी केली. यूपीएससी प्रमाणे राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक होणार आहे. परंतु ही परीक्षा वर्णनात्मक नको, अशी मागणीही विद्यार्थी करत आहेत. क्लर्क परीक्षेचा निकाल लवकर लावावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली. आयोगातील काही अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचाही आरोप परीक्षार्थींनी केला आहे.

पोलिसांचा गुन्हे दाखल करण्याचा इशारा

पुणे पोलीस आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे. आंदोलनासाठी परवानगी न घेता विद्यार्थी रस्त्यावर आले. तुमची मागणी संविधानिक मार्गाने मांडा रस्त्यावर बसून अडवू नका, असे पोलिसांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे डीसीपी संदीप गिल्ल यांनी सांगितले.

पुणे येथे एमपीएससीची परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी अभ्यास करत आहे. राज्यभरातील विविध शहरांमधून येऊन दोन-तीन वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधीसाठी विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीला वेळ देत आहे. परंतु त्यांना एमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकांच्या घोळाचा फटका बसला आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!