MSRTC : प्रवाशांची पळवापळवी रोखण्यासाठी एसटी महामंडळाची शक्कल, बस स्थानंकांमध्ये तैनात असणार विशेष पथक

| Updated on: Aug 13, 2022 | 7:30 AM

MSRTC केवळ या एजंटांना पकडू शकते. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही आणि म्हणून त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यांच्या स्वाधीन केले जाते. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

MSRTC : प्रवाशांची पळवापळवी रोखण्यासाठी एसटी महामंडळाची शक्कल, बस स्थानंकांमध्ये तैनात असणार विशेष पथक
पुणे एसटी स्टॅण्ड
Image Credit source: HT
Follow us on

पुणे : राज्य परिवहन महामंडळातर्फे बस स्थानकांमध्ये विशेष पथक तैनात करण्यात आली आहेत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या काळात पुणे राज्य परिवहन महामंडळांच्या बस स्थानकांत (Bus stands) राज्याच्या विविध भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. असे असतानाच प्रवाशांना आमिष दाखवण्यासाठी या स्टॅण्मध्ये अवैध दलालांचा (Illegal agents) वावरही वाढला आहे. कमी भाडे आकारण्याचे आमिष प्रवाशांना दिले जात आहे. यासंबंधी प्रवाशांनी तक्रारीही केल्या. आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) पुणे विभाग कारवाईच्या तयारीत आहे. या अवैध दलालांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर (आता वाकडेवाडी येथे स्थलांतरित) आणि पुणे स्टेशन या तीनही एसटी स्टँडवर विशेष पथके तैनात केली आहेत.

अधिकाऱ्यांना मदत

एमएसआरटीसीने स्थापन केलेली विशेष पथके सणासुदीच्या गर्दीच्या वेळी एसटीच्या अधिकाऱ्यांना मदत करणार आहेत. MSRTC पुणे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दलाल आणि त्यांच्या ट्रॅव्हल एजन्सी एसटी स्टँडच्या बाहेर त्यांच्या बस आणि इतर लहान वाहने उभी करतात. एजंट प्रवाशांना स्वस्त भाडे देऊन एसटी स्टँडपासून दूर घेऊन जातात. MSRTC केवळ या एजंटांना पकडू शकते. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही आणि म्हणून त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यांच्या स्वाधीन केले जाते. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. आता या बेकायदेशीर एजंटांना चाप बसणार आहे.

‘तक्रारी आल्या होत्या’

MSRTC पुणे विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड म्हणाले, की आम्हाला प्रवाशांकडून आणि आमच्या कर्मचार्‍यांकडून एसटी स्टॅण्डमध्ये, विशेषत: सणासुदीच्या काळात आणि लाँग वीकेंडमध्ये वाढत्या दलालांच्या तक्रारी आल्या होत्या. रक्षाबंधन आणि 15 ऑगस्टला जोडून येणाऱ्या सुट्ट्यांसाठी मोठ्या संख्येने लोक प्रवास करत असतात. या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील एसटी स्टँडवर मोठी गर्दी झाली होती. अधिक चांगली सेवा देण्यासाठी आणि एसटी स्टँडच्या आतून आमच्या प्रवाशांची होणारी पळवापळवी रोखण्यासाठी आम्ही आमच्या मुख्य एसटी स्टँडवर विशेष पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

ही बातमी वाचा :

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!