MSRTC : भंगारातून नवीन गाड्यांची पुनर्बांधणी, एसटी महामंडळाचा अनोखा उपक्रम; लाखो रुपयांची बचत

एसटी बस तोट्यात आहे, आता हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. भंगारातून नवीन गाड्यांची पुनर्बांधणी करण्यात येत असून, यातून लाखो रुपयांची बचत होत आहे.

MSRTC : भंगारातून नवीन गाड्यांची पुनर्बांधणी, एसटी महामंडळाचा अनोखा उपक्रम; लाखो रुपयांची बचत
अजय देशपांडे

|

Jul 03, 2022 | 9:19 AM

रायगड : एसटीचा (ST bus) प्रवास सर्वांनाच सुरक्षीत वाटतो. प्रवासासाठी नेहमी लालपरीला प्राधान्य दिले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. मागील दोन वर्ष कोरोनाची (Corona) लाट होती. कोरोनाने तर एसटीचे कंबरडेच मोडले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन (Salary) देखील थकले होते. कोरोना काळात जीवावर उदार होऊन एसटी कर्मचाऱ्यांनी काम केले, मात्र त्याचा त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. आंदोलनापूर्वी कोरोनामुळे आणि नंतर आंदोलनामुळे अनेक दिवस एसटी सेवा ठप्प होती. या काळात एसटी महामंडाळाला कोट्यवधीचा फटका बसला. मात्र आता एसटी सेवा पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली आहे. आता झालेला तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आता एसटी महामंडळाकडून टाकाऊपासून टिकाऊ उपक्रम राबवण्यात येत आहे. यामुळे एसटी महामंडळाचा लाखो रुपयांचा फायदा झाला आहे.

काय आहे उपक्रम

ठराविक वर्षानंतर जुन्या एसटी बस या भंगारात काढल्या जातात. बस भंगारात काढल्यामुळे त्यांचे मूल्य अत्यंत कमी होते. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसतो. मात्र यावर आता एसटी महामंडळाने उपाय शोधून काढला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे रायगड एसटी महामंडळाने टाकाऊपासून टिकाऊ ही अभिनव संकल्पना सुरू केली आहे. रायगड आगार प्रशासनाने मागील दोन ते तीन वर्षांत तब्बल 55 बस भंगारात काढल्या आहेत. मात्र यातून फार काही पैशांची वसुली होणार नसल्याने ज्या बस भंगारात काढण्यात आल्या आहेत, त्या बसचे वापरण्यायोग्य जे पार्ट आहेत ते पार्ट काढून दुसऱ्या बसेस तयार करण्यासाठी वापण्यात येत आहेत, यातून लाखो रुपयांची बचत होत आहे.

हे सुद्धा वाचा

92 लाखांचा नफा

रायगड एसटी प्रशासनाच्या वतीने टाकाऊपासून टीकाऊ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये ज्या एसटी बस भंगारात काढण्यात येणार आहेत, त्या एसटीचे वापरण्यायोग्य पार्ट हे नव्या एसटीच्या पुनर्बांधणीसाठी वापरण्यात येत आहेत. यामध्ये संबंधित एसटीच्या काचा, सीट, खिडक्या,पत्रे इंजिन गेअर बॉक्स असा विविध भागांचा समावेश आहे. यातून आतापर्यंत 92 लाखांचा नफा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें