Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे अंतर 25 मिनिटे कमी होणार

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा (Lonavala) ते खोपोली (Khopoli) एक्झिट या भागातील पर्यायी रस्त्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या एका बोगद्याचे काम डिसेंबर अखेरीस पूर्ण होणार आहे.

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे अंतर 25 मिनिटे कमी होणार
मुंबई - पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील अंतर आणखी 25 मिनिटांनी कमी होणार
सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 17, 2022 | 10:08 AM

मुंबई : जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अनेकदा वाहतूक कोंडीच्या समस्येला नागिरिकांना सामोरे जावे लागत होते. मुंबई पुणे जुना महामार्ग अरुंद व नागमोड्या वळणांचा असल्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी बराच वेळ नागरिकांना लगात होता. तसंच अनेकदा वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे प्रवास सुखकर आणि जलद गतीने प्रवास होण्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वे तयार करण्यात आला. मुंबई – पुणे एक्स्प्रेस  महामार्गावरील (Mumbai Pune Expressway) अंतर आणखी 25 मिनिटांनी कमी होणार आहे. तब्बल सहा किलोमीटरने हे अंतर कमी होणार असून या दोन शहरातील अंतर कमी करण्यासाठी मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा (Lonavala) ते खोपोली (Khopoli) एक्झिट या भागातील पर्यायी रस्त्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या एका बोगद्याचे काम डिसेंबर अखेरीस पूर्ण होणार आहे.

या मार्गावरील दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत बोगद्यांचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे लक्ष महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ठेवण्यात आले आहे. मुंबई पुणे द्रुतगती – मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किमी राहिलेल्या मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीकडून सुरु करण्यात आले आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

■ या प्रकल्पामुळे बोर घाटातील सहा किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार.

■ लोणावळापासून सुरु होणारा हा बोगदा पुढे खोपोली एक्झिट येथे संपणार.

■ यामध्ये दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ते बांधले जाणार आहेत.

■ पुण्याकडून मुंबईला जाताना असणारा बोगदा 9 किमी लांबीचा आहे.

हे सुद्धा वाचा

■ यातील साडेसहा किमीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. या बोगद्याची रुंदी 23.5 मीटर

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें