AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 2 दिवस मेगाब्लॉक, पर्यायी मार्ग काय?

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २३ आणि २४ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत पुलाच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक या काळात पर्यायी मार्गाने वळवण्यात येईल. सविस्तर माहितीसाठी वाचा.

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 2 दिवस मेगाब्लॉक, पर्यायी मार्ग काय?
mumbai pune expressway
| Updated on: Apr 23, 2026 | 7:36 AM
Share

मुंबई आणि पुण्याला जोडणारी लाईफलाईन म्हणजेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Expressway) आजपासून दोन दिवसांचा मोठा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) सुरू असलेल्या पुलाच्या तांत्रिक कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज भर दुपारी ३ तास महामार्ग बंद राहणार आहे. एकीकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच दुसरीकडे हा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा विचार करावा लागणार आहे.

नेमके कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरगाव आणि कुसगाव दरम्यान असलेल्या पुलावर दुरुस्ती आणि रंगकामाची अत्यंत महत्त्वाची कामे शिल्लक आहेत. यापूर्वी पुलाच्या बांधकामासाठी काही तात्पुरते लोखंडी सांगाडे उभारले होते, ते हटवण्यासाठी मोठ्या हायड्रा क्रेनचा वापर करावा लागणार आहे. महामार्गावर धावत्या वाहतुकीत हे काम करणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पूर्णपणे थांबवून हे काम पूर्ण केले जाणार आहे.

ब्लॉकची वेळ आणि वाहतुकीचे नियोजन

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ (मुंबईकडे जाणारी वाहतूक)

  • वेळ: दुपारी १२:०० ते दुपारी ३:०० पर्यंत.
  • पुण्याकडून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने या ३ तासांसाठी रोखली जातील.
  • मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना सोमाटणे फाटा, किवळे आणि देहूरोड मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (जुना मुंबई-पुणे रस्ता) वर वळवण्यात येईल. ही वाहने जुन्या महामार्गावरून प्रवास करून पुढे कुसगाव टोल प्लाझा येथून पुन्हा एक्स्प्रेस वेवर चढू शकतील.

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ (पुण्याकडे जाणारी वाहतूक)

  • वेळ: दुपारी १२:०० ते दुपारी ३:०० पर्यंत.
  • मुंबईकडून पुण्याकडे जाणारी सर्व वाहने बंद राहतील.
  • पुण्याकडे जाणारी वाहने कुसगाव टोल प्लाझामार्गे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (NH-48) वळवली जातील. ही वाहने देहूरोड आणि किवळे मार्गे पुन्हा पुण्याकडे जाऊ शकतील.

प्रवाशांच्या अडचणी आणि उपाययोजना

सध्या उन्हाळा तीव्र आहे. अशा परिस्थितीत भरदुपारी घेतलेल्या या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः खासगी वाहने आणि लक्झरी बसमधील प्रवाशांना या बदलाचा मोठा फटका बसू शकतो. तसेच प्रवासादरम्यान काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास ९८२२४९८२२४ (MSRDC नियंत्रण कक्ष) किंवा ९८३३४९८३३४ (महामार्ग पोलीस) या क्रमांकांवर तातडीने संपर्क साधता येईल. प्रवाशांनी या ३ तासांच्या काळात शक्य असल्यास आपला प्रवास पुढे ढकलावा किंवा नियोजित वेळेच्या किमान २ तास आधी घरून निघावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुढील प्रवासासाठी लक्षात ठेवा

ज्या वाहनचालकांना वेळेचे बंधन आहे, त्यांनी ब्लॉकच्या वेळेत एक्स्प्रेस वेऐवजी सुरुवातीपासूनच जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करणे हिताचे ठरेल. जरी हा मार्ग वेळखाऊ असला, तरी ब्लॉकमुळे होणाऱ्या ट्रॅफिक जॅममधून यामुळे सुटका होऊ शकते.

Follow Us
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल