AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: अशोक खरातचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत? आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी कुंडलीच काढली, सर्वात मोठी मागणी काय?

Vijay Kumbhar on Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असल्याचा खळबळजनक आरोप RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. त्यांनी खरातची कुंडलीच बाहेर काढली आहे. तर याप्रकरणात त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांवरही मोठी टीका केली आहे.

Ashok Kharat: अशोक खरातचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत? आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी कुंडलीच काढली, सर्वात मोठी मागणी काय?
अशोक खरात, रुपाली चाकणकर, विजय कुंभारImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 20, 2026 | 2:34 PM
Share

Vijay Kumbhar on Ashok Kharat: नाशिक येथील ज्योतिषी अशोक खरात याने लैंगिक शोषण केल्याची तक्रार एका महिलेने दिल्यानंतर एका मागून एक धक्कादायक प्रकरणं समोर येत आहेत. आता तर 100 हून अधिक लैंगिक शोषणाचे व्हिडिओ समोर आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला. तेव्हापासून त्या टीकेच्या धनी झाल्या आहेत. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी तर अशोक खरातचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी ज्योतिषी खरातची कुंडलीच बाहेर काढली आहे.

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या

रूपाली चाकणकर आणि भोंदू बाबा अशोक खरात यांचे जवळून संबंध आहेत. रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हाकलून द्यावं अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. त्यांनी भोंदू बाबांच्या ट्रस्टच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी दिलेलं आहे. तर 39 लाख लिटर पाणी देण्याचा प्रस्ताव आहे. त्याचे महाराष्ट्रासह आणि केंद्रीय गृहमंत्र्यासोबतचे फोटो आहेत.

पोलीसही खरातची मदत घ्यायचे

राजकीय पक्षासोबत अधिकारी बदलीसाठी जायचे, याची किती मोठी ताकद असेल. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस ही बाबाची मदत घेत होते, असा खळबळजनक दावा कुंभार यांनी केला आहे. बाबाची संपत्ती खूप मोठी आहे. आई, बायको मुलं यांच्या नावावर संपत्ती आहे. दीड किलोमीटरचा रस्ता त्याला बांधून कुणी दिला, असा सवाल त्यांनी केला.

चाकणकर यांची दमदाटी

या खरातच्या विरोधात ज्यांनी तक्रारी दिल्या. ज्यांनी बातम्या छापल्या त्यांना रुपाली चाकणकर यांनी दमदाटी केली. नोटीस आरोपी पर्यंत पोहचल्या याचा अर्थ रुपाली चाकणकर यांचा त्यांच्यासोबत जवळून संबंध आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना पदावरून हाकलून द्यावं.अजून ही त्या पदावर आहेत हे धोकादायक आहे, असे कुंभार म्हणाले. राजकीय व्यक्ती आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत फोटो असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत होणार नाही, अशी परिस्थिती होती याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!