संभाजी महाराजासंदर्भातील भूमिकेवर राष्ट्रवादी ठाम, पुण्यात काय लावले बॅनर

पुण्यात बॅनर लावले गेले आहे. त्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो आहे. त्यात संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकरणावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संभाजी महाराजासंदर्भातील भूमिकेवर राष्ट्रवादी ठाम, पुण्यात काय लावले बॅनर
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बॅनर लावले आहे
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 10:27 AM

पुणे संभाजी महाराज धर्मरक्षक होते? या विषयावर राज्यात वाद पेटला असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar)आपल्या भूमिकेवर ठाम होते. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यानंतर आता शरद पवार यांनी सावध भूमिका घेतली होती. ज्याल जे हवे ते म्हणावे, असे ते म्हणाले होते. परंतु आता पुण्यात बॅनलबाजीमुळे पुन्हा हा विषय पेटणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते, असं रोखठोक वक्तव्य केलं. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटानं तात्काळ आक्षेप घेतला. भाजपने अजित पवार यांच्या विरोधात आंदोलनंही सुरु केली होती. औरंगजेबनं छत्रपती संभाजी महाराजांना मुस्लिम धर्म स्वीकारण्याची ऑफर दिली होती. पण संभाजी महाराजांनी तीव्र यातना सहन केल्या. मात्र त्यांनी धर्म परिवर्तन केलं नाही. त्यामुळं संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलं जातं. तर स्वराज्य रक्षक म्हणजे, सर्वांचं…मातृभूमीचं रक्षण करणारा. पण राष्ट्रवादी किंवा अजितदादांचं म्हणण्याशी भाजप आणि शिंदे गट सहमत नाही. संभाजीराजेंनी स्वराज्याचं रक्षण करण्याबरोबरच, धर्माचंही रक्षण केलं. त्यामुळं संभाजीराजे धर्मवीरही होते, असं भाजपसह शिंदे गटाचं म्हणणे आहे.

या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भूमिका मांडली होती. ते म्हणाले होते, संभाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात आस्था आहे. या आस्थेतून रत्येक जण आपल्या मतानुसार त्यांना बिरुद लावतो. त्यासाठी वाद करण्याचं कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर राज्याचं रक्षण करण्यासाठी संभाजीराजे यांनी काम केलं. त्यामुळे कोणी त्यांना स्वराज्यरक्षक म्हणत असेल तर तेही चुकीचं नाही, असे शरद पवारा यांनी नमूद केलं.

हे सुद्धा वाचा

पुण्यात पुन्हा लागले बॅनर

हा विषय आता शांत झाला असताना पुण्यात बॅनर लावले गेले आहे. त्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो आहे. त्यात संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकरणावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.