‘माझी मुलगी स्वत:च्या कर्तृत्वाने 3 वेळा….’, शरद पवार यांचं नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर

"मणिपूर गेल्या ४५ दिवसांपासून वाईट अवस्था आहे. देशातील सर्व राज्यांची परिस्थिती हेच सांगतेय की, भाजप ही राज्य सांभाळू शकत नाही. त्यामुळे उद्या निवडणुकांचा निर्णय काय होईल याची खात्री नसल्यामुळे पंतप्रधानांनी अशोभणीय वक्तव्य केलंय", असं शरद पवार म्हणाले.

'माझी मुलगी स्वत:च्या कर्तृत्वाने 3 वेळा....', शरद पवार यांचं नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 5:41 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला सडेतोड शब्दांमध्ये उत्तर दिलं. नरेंद्र मोदी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. “माझी मुलगी स्वत:च्या कर्तृत्वाने तीनवेळा निवडून आलेली आहे. एखाद्यावेळेला पूर्वजांची पुण्यायी उपयोगी पडते. पण दुसरी आणि तिसरी निवडणूक आणि त्यानंतर पार्लमेंटच्या परफॉर्मन्समध्ये ९८-९९ टक्के अटेन्डन्स यामध्ये उच्च दर्जाचा क्रमांक आहे. तिला आठवेळा पुरस्कार मिळाला. पण मोदींनी काहीही सांगितलं तरी स्वत:चं कर्तृत्व असल्याशिवाय जनता वारंवार निवडून देत नाही. त्यामुळे मोदींचं वक्तव्य हे अशोभणीय आहे”, अशा शब्दांत शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.

“संसदेच्या सदस्याबद्दल असं मत व्यक्त करणं योग्य नाही. मी पंतप्रधानांची व्यक्तीगत टीका करत नाही. कारण ती इन्स्टीट्यूशन आहे. त्याबद्दल सन्मान ठेवला पाहिजे. पण इतर राज्यातील अस्वस्थता दिसून येत आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“मोदींनी शिखर बँकेबद्दल बोलले. पण मी कोणत्याच बँकेतून कधी कर्ज घेतलं नाही. शिखर बँक सोडा, मी कोणत्याच इतर बँकेतून कर्ज घेतलं नाही. शिखर बँकेसंदर्भात मागे एकदा तक्रार झाली होती. चौकशी झाली होती”, असं शरद पवार म्हणाले.

“राष्ट्रवादीची काही लोकांची काही नावं आली. भाजपमधील काही लोकांची नावं आली. त्यावर चौकशी करण्याची जबाबदारी राज्यावर होती. त्यावेळी राज्याचं मुख्यमंत्रीपद भाजपकडे होतं. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्या संबंध काळात त्यांनी काय केलं मला माहिती नाही. शिखर बँकेचा उल्लेख करण्याची गरज होती का ते मला माहिती नाही. अशा कुठल्याही संस्थेची आमचा संबंध नाही”, अशा शब्दांत शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.

शरद पवार आणखी काय-काय म्हणाले?

महिला आणि मुली यांच्यावरील हल्ल्याच्या घटना वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मी महाराष्ट्रातील काही ठिकाणांची अधिकृत माहिती सरकारकडून मिळवली आहे. मला सर्व महापालिकांची माहिती मिळाली नाही. पण पुणे, ठाणे, मुंबई आणि सोलापूरची माहिती मिळाली.

२३ जानेवारी ते २३ मे या कालावधीत पुण्यातून ९३७ मुली अथवा महिला या बेपत्ता आहेत. ठाणेमधून ७२१ बेपत्ता आहेत. मुंबईतून ७३८ आणि सोलापूर ६२ बेपत्ता आहेत. हा सगळा आकडा २४५८ आहेत. आणखी काही ठिकाणांची माहिती मी अधिकृत मिळवली. यामध्ये बुलढाणा, धुळे, पुणे ग्रामीण, वाशिंद, अमरावती, जळगाव, भंडारा, रत्नागिरी आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण एकूण ४४३१ मुली-महिला या बेपत्ता आहेत.

२२ आणि २३ या कालावधीत पोलीस आयुक्तालयात, पोलीस अधिक्षक या ठिकाणी दीड वर्षाच्या काळात एकत्र महिलांची संख्या ६८८९ आहेत. एवढ्या मुली-महिला बेपत्ता होतात. मिळू शकत नाहीत. मला वाटतं गृहमंत्र्यांनी बाकीचे वक्तव्य करण्यापेक्षा बेपत्ता महिला आणि मुलींना शोधलं पाहिजे. या महिलांना शोधून त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधिन करण्याची जास्त आवश्यकता आहे.

देशाचे पंतप्रधान मोदी यांनी काही गोष्टी सांगितल्या. समान नागरी कायद्याबद्दल त्यांनी मत मांडलं. एका देशात दोन वेगवेगळे कायदे कसे असू शकतात ते सांगितलं. मी याबाबत आमच्या पक्षाची भूमिका सांगतो. केंद्र सरकारने निधी आयोगाकडे हा विषय सोपवला. निधी आयोगाकडे या विषयी रस असणारे ९०० प्रस्ताव आलेले आहेत. त्यामध्ये काय म्हटलंय ते माहिती नाही.

निधी आयोगासारखी जबाबदार संस्था खोलात जाते, लोकांकडे प्रस्ताव मागते, त्यावर ९०० प्रस्ताव येतात. याचा अर्थ या प्रस्तावातून त्यांची काय सूचना आहे ते पहिल्यांदा द्यायची गरज आहे. समान नागरी कायद्यात शिख, ख्रिश्चन समाज यांच्याबद्दल भूमिका काय ते स्पष्ट करण्याची गरज आहे. मला काळजी एका गोष्टीची आहे की, शीख समाजाचं वेगळं मत आहे.

समान नागरी कायद्याला समर्थन करण्याची त्यांची मनस्थिती नाही. त्याबाबत मी माहिती घेतोय. या मताला दुर्लक्षित करणे किंवा त्याची नोंद न घेणं यावर निर्णय घेणं योग्य होणार नाही. पंतप्रधानांनी या गोष्टींना हात घातला आहे. त्यांनी भूमिका मांडावी. त्यानंतर आमचा पक्ष निर्णय घेईल. देशातील चित्र बघितल्यानंतर लोकांमध्ये असलेली सध्याच्या राजकारण्यांबद्दलची अस्वस्था आणि नाराजी दुसरीकडे विचलित करण्यासाठी प्रयत्न आहे का? अशी शंका आहे.

आता इथून पुढे एका वर्षात देशाच्या लोकसभेच्या निवडणुका येतील. त्याआधी काही राज्यांच्या निवडणुका आहे. पण कर्नाटक, हिमाचल प्रदेशमध्ये आपण पाहिलं. भाजप पक्ष यांचा लोकमताचा पाठिंबा राज्य पातळीवर काय आहे हे पाहण्याची गरज आहे. त्यामध्ये तुम्ही देशाचा नकाशा तुमच्यासमोर ठेवा. अनेक राज्यांमध्ये भाजपचं राज्य नाही.

गोवामध्ये काँग्रेसचं बहुमत होतं. त्यांची सत्ता होती. पण त्यांचे काही आमदार फोडले आणि ते भाजपात गेले. त्यामुळे तिथे सत्ता आली. मध्यप्रदेशमध्ये कमलनाथांच्या नेतृत्वात सरकार होतं. पण तिथले काही आमदार फोडले आणि त्याठिकाणी राज्य आणलं. महाराष्ट्रात काय केलं ते मी वेगळं सांगत नाही.

याचा अर्थ असा आहे, गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम आणि मणिपूर. मणिपूर गेल्या ४५ दिवसांपासून वाईट अवस्था आहे. हे सगळं राज्यांची परिस्थिती हेच सांगतेय की, भाजप ही राज्य सांभाळू शकत नाही. त्यामुळे उद्या निवडणुकांचा निर्णय काय होईल याची खात्री नसल्यामुळे पंतप्रधानांनी अशोभणीय वक्तव्य केलं.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.