इंदापूरच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या गावात 10 वर्षानंतर राष्ट्रवादीचा सरपंच

निमगाव केतकी ग्रामपंचायतीमध्ये भाजप पुरस्कृत श्री केतकेश्वर ग्रामविकास पॅनलचे ५ उमेदवार तर राष्ट्रवादी पुरस्कृत सुवर्णयुग ग्रामविकास पॅनलचे १२ उमेदवार निवडून आले होते. | Pune Indapur village Nimgaon ketki

इंदापूरच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या गावात 10 वर्षानंतर राष्ट्रवादीचा सरपंच

पुणे: इंदापूर तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या निमगाव-केतकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण डोंगरे हे 12 विरुद्ध 5 मतांनी विजय झाले आहेत. (NCP win gram panchayat election Pune Indapur village Nimgaon ketki)

प्रवीण डोंगरे यांचे वडील राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष व सुवर्णयुग पतसंस्थेचे अध्यक्ष दशरथ डोंगरे हे देखील 2006 च्या निवडणुकीत निमगाव-केतकी गावाच्या सरपंचपदी निवडून आले होते. त्यामुळे वडील व मुलगा गावचे सरपंच होण्याचा मान डोंगरे कुटुंबाला मिळाला आहे.

निमगाव केतकी ग्रामपंचायतीमध्ये भाजप पुरस्कृत श्री केतकेश्वर ग्रामविकास पॅनलचे ५ उमेदवार तर राष्ट्रवादी पुरस्कृत सुवर्णयुग ग्रामविकास पॅनलचे १२ उमेदवार निवडून आले होते.

सरपंच निवडीच्या वेळी राष्ट्रवादी पुरस्कृत सुवर्णयुग ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदासाठी प्रवीण दशरथ डोंगरे तर उपसरपंच पदासाठी सचिन दत्तात्रय चांदणे यांनी आपले अर्ज दाखल केले होते. तर भाजप पुरस्कृत श्री केतकेश्वर ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदासाठी रीना सुभाष भोंग तर उपसरपंच पदासाठी अर्चना अनिल भोंग यांनी आपले अर्ज दाखल केले होते.

या लढतीत सुवर्णयुग ग्रामविकास पॅनलचे प्रवीण डोंगरे यांना 17 पैकी 12 मते मिळाली मिळाली तर उपसरपंच पदासाठी सचिन चांदणे यांना 17 पैकी 11 मते मिळाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी राखुंडे यांनी सरपंच पदी प्रवीण डोंगरे यांना तर उपसरपंचपदी सचिन चांदणे यांना विजयी घोषित केले.

दहा वर्षानंतर ग्रामपंचायत पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात

इंदापूर तालुक्याच्या राजकारणात निमगाव-केतकी हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे याठिकाणी पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येण्याला अनेक अर्थांनी महत्त्व आहे.

निमगाव केतकी ग्रामपंचायतीवर दहा वर्षानंतर राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आल्याने फटाक्यांची मोठी आतिषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

(NCP win gram panchayat election Pune Indapur village Nimgaon ketki)

Published On - 3:11 pm, Wed, 10 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI