AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी लोकसभेच्या कोणत्या जागा लढवणार…अजित पवार यांनी केला निर्णय जाहीर

NCP convention in Karjat Ajit Pawar | मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे, ही आपली इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. आपल्याकडे चार लोकसभेच्या जागा आहे. त्या लढवणार आहोत. परंतु इतर ठिकाणी उमेदवार देणार आहोत.

राष्ट्रवादी लोकसभेच्या कोणत्या जागा लढवणार...अजित पवार यांनी केला निर्णय जाहीर
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Dec 01, 2023 | 12:37 PM
Share

कर्जत, पुणे | 1 डिसेंबर 2023 : बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोत. सध्या या जागा आपल्याकडे आहे. परंतु इतर काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे असणाऱ्या काही जागा आपण लढवणार आहोत. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय होणार आहे.  पाच राज्यातील निवडणुकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी महाराष्ट्रातील जागांवर  चर्चा होणार आहे. कर्जत येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली. अधिवेशनाचा हा शेवटचा आणि दुसरा दिवस आहे.

भाजपसोबत यासाठी गेलो

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे, ही आपली इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. जास्तीत जास्त खासदार निवडून आपणास आणावे लागणार आहे. राज्य विधानसभेचे अधिवेशन ७ फेब्रवारीपासून होत आहे. त्यात पूर्णअर्थसंकल्प मांडता येणार नाही. परंतु महत्वाच्या कामांना निधी मंजूर केले जाणार आहे.

आमच्यावर आरोप होते की गुन्हे दाखल होते म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो. विकास कामे व्हावी, यासाठी आपण सरकारमध्ये आला आहोत. माझ्यावर जे आरोप झाले ते निर्णय मी एकट्याने घेतले नव्हते. त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी होती.

राष्ट्रवादीची जिल्हाध्यक्षांना प्राधान्य

मंत्रालयात भेटीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आमदार यांच्यानंतर मंत्रालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महत्वाचे असणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी सरकार असले म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्रोम ठरवला जातो. मंत्रिमंडळ विस्तारात आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्री करता आले नाही, म्हणून ते नाराज झाले. परंतु त्यांना समजवले. त्यांना कार्यध्यक्षपद देण्याचे आश्वासन दिले. आता शब्द दिला म्हणजे तो अंमलात आणावेच लागणार आहे. शब्द देताना दहा वेळा विचार करा, असे अजित पवार यांनी सांगितले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.