AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट, तीन जण पोलिसांच्या ताब्यात

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट, तीन जण पोलिसांच्या ताब्यात
| Updated on: Sep 02, 2024 | 9:09 AM
Share

NCP Leader Vanraj Andekar Murder Case Update : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली. पुण्यातील नाना पेठ येथील डोके तालमीच्या समोर वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. इतकंच नाहीतर आरोपींनी गोळ्या घालून झाल्यावर कोयत्यानेही त्यांच्या सपासप वार केले. याप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक वाद आणि पैशांवरु झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तीन जणांची कसून चौकशी सुरु आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांच्यावर वारही करण्यात आले. आता वनराज यांच्यावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला असून हा गोळीबार निकटवर्तीयांकडूनच झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वनराज आंदेकर यांच्या हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. गणेश कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषार आबा कदम अशी या तिघांची नावे आहेत. गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू उर्फ सुर्यकांत आंदेकर याचा जावई असल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकं काय घडलं?

वनराज आंदेकर कार्यजवळ एकटेच उभे होते, त्यावेळी डोके तालीम चौकातील लाईट घालवण्यात आली. अंधाराचा आणि आंदेकर एकटे असल्याचा फायदा घेत आरोपी दुचाकीवर आले आणि पाच राऊंड फायर केले. गोळीबार झाल्यावर परिसरात मोठी खळबळ उडाली. आरोपींनी वनराज आंबेकर यांच्यावर गोळीबार केल्यावर कोयत्यानेही वार केले. काही क्षणात आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. वनराज आंदेकर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हत्येमागचे नेमके कारण काय आणि यामध्ये आणखी आरोपी आहेत का हे आता पोलीस तपासामध्ये समोर येईल.

पुण्यातील नाना पेठेमध्ये आंदेकर टोळीचा दबदबा राहिला आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याला प्रमोद माळवदकर या गुंडाच्या हत्येमध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. बंडू आंदेकर याच्याविरूद्ध 1985 पासून हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Follow Us
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील