AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule | ‘माझ्या भावाच्या भेटीसाठी मला गुप्त बैठकीची…’, सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबद्दल पुन्हा मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काही दिवसांपूर्वी पुण्यात गुप्त बैठक झाली होती. या गुप्त बैठकीवर सुप्रिया सुळे यांनी आज पुन्हा प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.

Supriya Sule | 'माझ्या भावाच्या भेटीसाठी मला गुप्त बैठकीची...', सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Aug 25, 2023 | 5:10 PM
Share

पुणे | 25 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाली होती. या गुप्त बैठकीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना आज पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी आज सकाळीच माध्यमांना प्रतिक्रिया देताना अजित पवार हे आमचे नेते असल्याचं वक्तव्य केलं होतं. नंतर दोघांनी आपल्या वक्तव्यावर घुमजाव केलं. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे आपले भाऊ असल्याचं म्हणत गुप्त बैठकीच्या प्रश्नावर महत्त्वाचं वक्तव्य केलं.

“आम्ही वेगळी भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचं पाऊल उचललं आहे. आम्ही विधानसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेच्या अध्यक्षांना याबाबतचं पत्र पाठवलेलं आहे. आम्ही अजूनही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही फूट नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या स्थापनेपासून अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत”, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलीही फूट नाही. आमच्या पक्षाच्या 9 आमदार आणि 2 खासदारांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्यांना जी काही नोटीस पाठवायची ती पाठवलेली आहे. आम्ही त्यांच्या स्पष्टीकरणाची वाट पाहतोय”, असं सुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

गुप्त बैठकीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या….

“अजित पवार यांच्यासोबत गुप्त बैठक मी तरी घेतलेली नाही. मला भावाला भेटायला सिक्रेट मिटींग करायची गरज नाही. आम्ही पारदर्शकपणे जगतो. या लोकशाहीत लपवायचं तरी काय?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. “मी भाजपच्या किती लोकांना दिल्लीत भेटते, मी त्यांना लपून थोडी भेटते. उघडपणे भेटते. विरोधक माझा शत्रू आहे, असे माझ्यावर झालेले संस्कार नाहीत. आमचे विरोधकांसोबत, भाजपसोबत वैचारिक लढाई आहे. आमची वैयक्तिक लढाई कुणाहीसोबत नाही”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

अजित पवारांसाठी परतीचे दरवाजे खुले आहेत का?

“आम्ही कायदेशीर कारवाईसाठी प्रकियेने जाणारे लोकं आहोत. त्यामुळे आम्ही योग्य प्रकियेने जातोय”, असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी सुप्रिया सुळे यांना एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार यांच्यासाठी परतीचे दरवाजे खुले आहेत का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली.

“एकतर मला तो अधिकार नाही. मी पक्षामधील एक खूप लहान कार्यकर्ती आहे. मी एक खासदार आहे तोपर्यंत मी माझ्या जबाबदारी करतेय. वर्किंग प्रेसिडेंट म्हणून माझे बॉस शरद पवार आहेत. कारण ते पक्षाचे देशाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सकाळी एक स्टेटमेंट केलेलं आहे. एकदा आपल्या पेक्षा मोठ्या नेत्याने एक स्टेटमेंट केलं असेल तर बॉस इज अलवेज राईट”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

यावेळी सुप्रिया सुळे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुळे यांनी बावनकुळे यांना टोला लगावला. “मला वाबनकुळे यांचे मन:पूर्वक आभार मानायचे आहेत. त्यांच्याकडे 303 खासदार आहेत, त्यांच्याकडे 200 आमदार आहेत. याचा अर्थ शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात काहीतरी खासियत असली पाहिजे ना, 300 खासदार आणि 200 आमदार असले तरी त्यांना आम्ही हवेहवेसे वाटत आहोत”, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

‘हा आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय’

अजित पवार यांच्या गटावर कुठपर्यंत कारवाई करण्यात आली? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर “हा आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. याबद्दल आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील हेच व्यवस्थित सांगतील. संविधानाच्या चौकटीत ज्या गोष्टी आहे ते पाळू”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

Follow Us
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल