Pune Neo-metro project : लांबणीवर पडणार पुण्यातला निओ-मेट्रो प्रकल्प; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या?

| Updated on: May 23, 2022 | 5:20 PM

1986मध्ये PMCने पुण्याचा विस्तार करण्यासाठी अंतर्गत 'रिंग रोड' बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पीएमसीने एचसीएमटीआर प्रकल्पाचा आराखडा तयार केला होता. भूसंपादनाअभावी आणि आर्थिक अडचणींमुळे हा प्रकल्प कागदावरच राहिला.

Pune Neo-metro project : लांबणीवर पडणार पुण्यातला निओ-मेट्रो प्रकल्प; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या?
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : निओ-मेट्रो प्रकल्प (Neo-metro project) इतरत्र राबविला जात नाही तोपर्यंत त्याची अंमलबजावणी करू नये, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात अधिकाऱ्यांना दिले आहेत. नाशिक येथील संबंधित योजना कागदावरच राहिली आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो)द्वारे सादर केलेल्या उच्च क्षमतेच्या मास ट्रान्झिट मार्गाच्या (एचसीएमटीआर) 36 किमी लांबीच्या प्रस्तावित निओ-मेट्रो प्रकल्पासाठीचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) पवार तपासत होते. ते म्हणाले, की निओ-मेट्रो प्रकल्प महाराष्ट्रात कुठेही सुरू झाला आहे का? जर आपण एखादा प्रकल्प सुरू केला आणि तो अयशस्वी झाला तर आपण काय करावे? निर्णय घेण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रकल्प सुरू होऊ द्या. नवीन पुणे महानगरपालिका (PMC) प्रमुख निवडून आल्यावर आम्ही या प्रकल्पावर चर्चा करू, असे ते म्हणाले.

82.5 किमी लांबीचा टप्पा

महा-मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ म्हणाले, की आम्ही महा-मेट्रोचा 82.5 किमीचा DPR फेज 2 उपमुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. त्यात एचसीएमटीआरच्या निओ-मेट्रोच्या एका मार्गाचा समावेश आहे. उपमुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प नाकारला नाही, पण नाशिकची योजना पूर्ण होईपर्यंत थांबा. केंद्र सरकारकडून तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर महा-मेट्रो 32 किलोमीटरच्या नाशिक मेट्रो निओ प्रकल्पावर आधीच काम करत आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. 82.5 किमी लांबीचा हा टप्पा असणार आहे.

हे सुद्धा वाचा

आगामी निवडणुकीनंतर मेट्रोचा निकाल?

1986मध्ये PMCने पुण्याचा विस्तार करण्यासाठी अंतर्गत ‘रिंग रोड’ बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पीएमसीने एचसीएमटीआर प्रकल्पाचा आराखडा तयार केला होता. भूसंपादनाअभावी आणि आर्थिक अडचणींमुळे हा प्रकल्प कागदावरच राहिला. माजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा प्रकल्प पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतु फडणवीस (तत्कालीन मुख्यमंत्री) यांनी सुचवले, की त्यावेळी प्रकल्प राबविणे अवघड आहे आणि विविध पर्यायांचा विचार केला पाहिजे. त्यानंतर पवार यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला. अखेर गेल्या वर्षी एचसीएमटीआर मार्गावर निओ-मेट्रोच्या पर्यायाचा विचार करून महा-मेट्रोला डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महा-मेट्रोने डीपीआर तयार केला असला तरी आगामी महापालिका निवडणुकीनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी सुचवले आहे.