Ajit Pawar Vs Raj Thackeray : त्यांना जे म्हणायचं ते म्हणू द्या, आम्हाला विकासावर बोलायचंय; बारामतीत अजित पवार यांचा राज ठाकरेंना टोला

Ajit Pawar Vs Raj Thackeray : त्यांना जे म्हणायचं ते म्हणू द्या, आम्हाला विकासावर बोलायचंय; बारामतीत अजित पवार यांचा राज ठाकरेंना टोला
अजित पवार/राज ठाकरे
Image Credit source: tv9

विकासाच्या मुद्द्याला महत्त्व द्यायला हवे. याला काय वाटतंय, त्याला काय वाटतंय, हे विचारू नका, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. तसेच त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या, विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत.

नविद पठाण

| Edited By: प्रदीप गरड

May 22, 2022 | 2:50 PM

बारामती, पुणे : त्यांना जे म्हणायचे ते म्हणू द्या, तुम्ही असले धंदे दाखवायचे बंद करा, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर दिली आहे. ते बारामतीत बोलत होते. राज ठाकरे यांची पुण्यात सभा झाली. यावेळी त्यांनी भोंग्यांचे आंदोलन (Loudspeaker) तसेच अयोध्या दौरा यासह विविध विषयांवर मतप्रदर्शन केले. त्यावर विचारले असता अजित पवार यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) टीकास्त्र सोडले. ज्याच्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याऐवजी जातीय सलोखा निर्माण होईल त्यावर बोला, असे ते म्हणाणे. तर विकासाच्या मुद्द्याला महत्त्व द्यायला हवे. याला काय वाटतंय, त्याला काय वाटतंय, हे विचारू नका, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. तसेच त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या, विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत.

राज ठाकरेंच्या आंदोलनावर काय म्हणाले होते अजित पवार?

राज ठाकरे भावनात्मक राजकारण करतात. त्यांनी आंदोलने केली पण एकही आंदोलन पूर्ण न करता अर्धवट सोडली, अशी टीका अलिकडेच अजित पवार यांनी केली होती. टोलचे आंदोलन केले. एक दिवस त्यांचे कार्यकर्ते होते. नंतर ते दिसले नाहीत. त्यानंतर परप्रांतियांचे आंदोलन केले. त्यामुळे राज्यात बांधकामे खोळंबली, आर्थिक नुकसान झाले. ते आंदोलन मागे पडले. याच्यासोबतच अशी अनेक आंदोलने अर्धवट सोडली. यातून केवळ नुकसानच झाल्याचे अजित पवार म्हणाले होते. तसेच त्यांना स्वस्तातली प्रसिद्धी हवी असल्याची टीकाही त्यांनी केली होती. त्यावर राज ठाकरे यांनी आज प्रत्त्युत्तर देत आपली बाजू मांडली. कोणतेही आंदोलन मागे सोडलेले नाही. टोलच्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणचे टोल बंद झाले. मनसेमुळे राज्यातील भोंगे पहिल्यांदाच बंद किंवा अत्यंत कमी आवाजात होत असल्याचा दावा त्यांनी आजच्या सभेत केला.

‘पुन्हा वाढवू नये म्हणजे झाले?’

केंद्र सरकारने आज पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी केल्यात. उद्या वाढवू नये म्हणजे झाले. इंधन दरवाढीविरोधात लोकांनी विरोध सुरू केला होता. त्यामुळे हा निर्णय घेतलेला दिसतोय, असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. दोन वर्षे कोरोनामुळे बिकट गेलेली असतानाही सरकारने कोणताही कर वाढवला नाही. देशात एकच जीएसटी कर लावला. तर त्यातले काही पैसे केंद्राला आणि राज्याला मिळतील, असे अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अजित पवारांनी केली राज ठाकरेंवर टीका

‘अनेक वर्ष प्रलंबित होती लाकडी निंबोळी योजना’

उजनीतून पाणी वाटपाबाबतची लाकडी निंबोळी योजना ही खूप जुनी आहे. बरीच वर्षे ही मागणी प्रलंबित होती. मात्र आता त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सोलापूरकरांना विनंती आहे, की त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री बदलाचे संकेत त्यांनी यावेळी दिले. पालकमंत्री कोण, कुठे असावा हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचे आहेत, असेही ते म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें