Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : राज्यातील कोणत्या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने कुठे दिला पावसाचा अंदाज

weather update and rain : राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच शनिवारी राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.

Rain : राज्यातील कोणत्या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने कुठे दिला पावसाचा अंदाज
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 10:12 AM

पुणे | 5 ऑगस्ट 2023 : राज्यात गेल्या आठवड्यात सर्वत्र पाऊस झाला होता. मात्र काही दिवसांपासून काही भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. आता काही ठिकाणी पाऊस सुरु झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. शनिवारी सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असणार आहे. त्यानंतर रविवारी सातारा अन् पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुण्यात शनिवारी सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.

पुणे शहरात पुन्हा पाऊस

पुणे शहरात दोन दिवस पावसाने उघडीप दिली होती. मात्र शनिवारी पुन्हा सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस पुणे शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट

पुणे, रायगड, रत्नागिरी, परभणी, नांदेड, चंद्रपूर, नागपूर वर्धा या ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. राज्यात काही भागांत अतिवृष्टी झाली. मुसळधार पाऊस झाला. परंतु काही भागांत अजून पुरेसा पाऊस झालेला नाही. धुळे जिल्ह्यामध्ये सरासरी फक्त 75 टक्के पाऊस झाला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री वगळता जिल्ह्यात कुठेही सरासरी पाऊस झालेला नाही. शिरपूर तालुक्यामध्ये केवळ 60 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. यामुळे जिल्ह्यात पेरण्या कमी झाल्या आहेत. सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्रावर अजूनही पेरणी नाही.

हे सुद्धा वाचा

कोयना धरण 76.64 टक्के भरले

कोयना धरणात पाणीसाठा 80.67 टीएमसी झाला आहे. कोयना धरण 76.64 टक्के भरले आहे. धरणातून एकूण 2100 कयुसेक पाणी विसर्ग सुरू आहे. धरणात 13 हजार 309 क्यूसेक पाणी आवक सुरु आहे. पुणे जिल्ह्यात नीरा नदीच्या खोऱ्यात वीर, भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी हे धरण आहे. या ठिकाणी जलसाठा 82 टक्‍क्‍यांहून जास्त झाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील 54 पाणी प्रकल्पात 71 टक्के जलसाठा झाला आहे. संततधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील पाणीसाठामध्ये मोठी वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात अप्पर वर्धा धरणात 81 टक्के जलसाठा झाला आहे.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.