AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे जिल्हा बँक अध्यक्षपद, इच्छुकांची मोर्चेबांधणी, अजित पवार कोणाला संधी देणार?

अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अजितदादा कोणाला अध्यक्षपदाची संधी देणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अध्यक्ष पदासाठी आमदार अशोक पवार, विकास दांगट आणि दिगंबर दुर्गाडे यांची नावं चर्चेत आहेत.

पुणे जिल्हा बँक अध्यक्षपद, इच्छुकांची मोर्चेबांधणी, अजित पवार कोणाला संधी देणार?
AJIT PAWAR
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Anish Bendre | Updated on: Jan 14, 2022 | 10:19 AM
Share

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Co Operative Bank Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने निर्विवाद विजय मिळवला. त्यानंतर बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 15 जानेवारीला अध्यक्षांची निवड होणार असून तिघा जणांची नावं चर्चेत आहेत. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी अजित पवारांनी बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी 10 वाजता अजित पवार सगळ्या संचालक मंडळाची जिल्हा बँकेत बैठक घेणार असून दुपारी 1 वाजता होणार अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे अजित पवार कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बॅंकेच्या संचालक मंडळाच्या 21 पैकी 16 जागा जिंकत राष्ट्रवादीचे बॅंकेवर एकहाती वर्चस्व आहे. या 16 जणांना एका अपक्षाची साथ मिळणार आहे.

नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याचे संकेत

अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अजितदादा कोणाला अध्यक्षपदाची संधी देणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अध्यक्ष पदासाठी आमदार अशोक पवार, विकास दांगट आणि दिगंबर दुर्गाडे यांची नावं चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले.

कोणी कुठली जागा जिंकली?

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार 73 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील चांदेरे हे 27 मतांनी विजयी झाले आहेत. चांदेरे यांनी भाजपचे आत्माराम कलाटे यांना पराभूत केलं आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादीच्या पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे यांचा विजय झाला, तर आशा बुचके यांना पराभवाचा धक्का बसला.

कोणाकोणाची बिनविरोध निवड?

प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate), पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) बिनविरोध निवडून आले. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil), “ब” वर्गातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Datta Bharne), इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

अजितदादांची एकहाती सत्ता

पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.

संबंधित बातम्या :

अजितदादांनी ज्या प्रदीप कंद यांना ‘जागा दाखवण्यासाठी’ दंड थोपटले, त्यांनीच निवडणुकीत ‘जागा’ जिंकली

पुणे जिल्हा बँक अजितदादांच्या खिशात, एक जागा गमावली, कारण बारामतीतच 52 मतं फुटली

पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादांना रुखरुख लावली, भाजपचे एकमेव शिलेदार प्रदीप कंद फडणवीसांच्या भेटीला

Follow Us
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल