AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात पुन्हा एल्गार परिषद होणार, आता भाजप नेमकं काय करणार?

एल्गार परिषदेला अखेर परवानगी देण्यात आली आहे. अखेर पुणे पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे. 30 जानेवारीला ही परिषद होणार आहे. | Permission of Pune Police to Elgar parishad B J Kolse patil

पुण्यात पुन्हा एल्गार परिषद होणार, आता भाजप नेमकं काय करणार?
Elgar Parishad
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jan 24, 2021 | 7:06 AM
Share

पुणेएल्गार परिषदेला अखेर परवानगी देण्यात आली आहे. माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील यांनी पुणे पोलिसांकडे ही परवानगी मागितलेली होती. अखेर पुणे पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे. 30 जानेवारीला ही परिषद होणार आहे. (Permission of Pune Police to Elgar parishad B J Kolse patil)

गेल्या अनेक दिवसांपासून माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील एल्गार परिषदेला परवानगी मिळावी म्हणून  झटत होते. अखेर पुणे पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे. ही परिषद येत्या शनिवारी (30 तारखेला) स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेला परवानगी मिळावी, यासाठी अर्ज स्वारगेट पोलिसांकडे दिला होता.

कोणत्याही परिस्थितीत एल्गार परिषद होणारच, असा निर्धार बी.जे. कोळसे पाटील यांनी केला होता. राज्य सरकारने सभागृहात परवानगी दिली नाही तर एल्गार परिषद रस्त्यावर घेऊ, असे कोळसे-पाटील यांनी सांगितलं होतं. शिवाय हे सरकार मनुवादी विचारांनी ग्रासले आहे. सरकार कुणाचंही असलं तरी बाटली जुनी फक्त पाणी नवं आहे, अशा शेलक्या शब्दात कोळसे पाटलांनी हल्ला चढवला होता.

यापूर्वी पुणे पोलिसांनी 31 डिसेंबरच्या नियोजित एल्गार परिषदेला परवानगी नाकारली होती. कोरोना परिस्थिती आणि रात्रीच्या संचारबंदीचे (नाईट कर्फ्यू) कारण देत स्वारगेट पोलिसांनी ही परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले होते.

भाजप तसंच उजव्या विचारसरणीच्या लोकांनी, पक्षांनी किंबहुना संस्थांनी पुण्यातील एल्गार परिषदेच्या आयोजनाला कायमच विरोध केलाय. ही परिषद होऊ नये म्हणून तत्सम मंडळींनी जोरदार प्रयत्न केले. मात्र असं असतानाही आता 30 जानेवारीला ही परिषद पुण्यात पार पडतीय. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे किंबहुना हालचालीकडे सगळ्यांचंच लक्ष असेल.

एल्गार परिषद वादाची किनार का?

डिसेंबर 2017 ला शनिवार वाड्यात एल्गार परिषद पार पडली. त्यानंतर कोरेगाव-भीमाला मोठी दंगल उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध एल्गार परिषदेशी जोडण्यात आला अन एल्गार परिषदेवर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर हा तपास एनआयएने ताब्यात घेत देशभरात डाव्या विचारांच्या अनेक बुद्धिजीवींना अटक केली. यावरुन देशभरात डाव्या विचारांच्या लोकांनी मोठं काहूर माजवलं. या सगळ्या परिस्थितीत इतका वादंग सुरु असताना पोलिसांनी परवानगी देवो, अथवा न देवो यंदाही एल्गारची सांस्कृतिक परिषद होणारच, असा निर्धार बी. जी. कोळसे-पाटील यांनी व्यक्त केला होता.

एल्गार परिषदेविरोधात 118 याचिका दाखल

शहरी नक्षलवादाशी जोडली गेलेली एल्गार परिषद, त्यानंतर देशातील महत्त्वाच्या बुद्धिजीवींना झालेली अटक यावरुन मोठा वाद झाला. डाव्या आणि उजव्या विचारांचा हा संघर्ष इतक्या शिगेला पोहोचलाय की आत्तापर्यंत या प्रकरणात देशातील विविध न्यायालयात 118 याचिका दाखल आहेत. (Permission of Pune Police to Elgar parishad B J Kolse patil)

हे ही वाचा

सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारली तरी एल्गार परिषद घेऊच; तुरुंग, मरणाला घाबरत नाही: कोळसे-पाटील

मोठी बातमी: पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी नाकारली

Follow Us
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...