AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार अन् गिरीश बापट यांच्या ‘त्या’ सभाही विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत

कसबा पेठेते ब्राह्मण उमेदवार दिला नाही, यामुळे नेहमी भाजपसोबत असणार समाज नाराज झाला. यासंदर्भात बॅनरबाजी करण्यात आली.

शरद पवार अन् गिरीश बापट यांच्या 'त्या' सभाही विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत
गिरीश बापट अन् शरद पवारImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
| Updated on: Mar 02, 2023 | 2:34 PM
Share

पुणे : कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीचा (BY Election) निकाल लागला आहे. कसबा पेठेत भाजपला धक्का बसला तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला हादरा बसला. ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करण्यासाठी कसबा पेठेत भाजपने आजारी बापट यांना व्हिलचेअरवरुन आणले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले पोटनिवडणुकीत न वापरणारे पवार अस्त्र बाहेर काढले होते. परंतु मतदार राजाने ही दोन्ही अस्त्र निकामी केली. अन् मतदार काय असतो, हे दाखवून दिले.

पिंपरी-चिंचवड हा कधीकाळी राष्ट्रवादीचा गड होता. दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप हे कधीकाळी राष्ट्रवादीचे नेते होते. अजित पवार यांच्या सर्वांत जवळचे सहकारी होते. परंतु ते भाजपत गेल्यावर राष्ट्रवादीचा गड हालला. हा गड पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पवार यांचे अस्त्र बाहेर काढले. शरद पवार यांनी २१ फेब्रुवारी रोजी सभा घेतली. त्यावेळी स्वत: शरद पवार म्हणाले होते की,आपण पोटनिवडणूक प्रचाराला जात नाही. पण पक्षाच्या पडत्या काळात ज्यांनी पक्षाला साथ दिली त्यांच्याशी दोन शब्द बोलता येईल म्हणून मी आलो आहे.

जयंत पाटील यांना आठवली साताऱ्याची सभा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या पावसातील सभेचा संदर्भ दिला. शरद पवारांच्या पावसातील सभेमुळं अनेकांची मतं वाढली. काँग्रेस असो वा पुरस्कृत उमेदवार असो त्यांचा ही फायदा झाला. आता त्याची पुनरावृत्ती होईल. परंतु जयंत पाटील यांचा आशावाद मतदारांनी फोल ठरवला.

कसबा पेठेत ब्राह्मण समाज नाराज

कसबा पेठेते ब्राह्मण उमेदवार दिला नाही, यामुळे नेहमी भाजपसोबत असणार समाज नाराज झाला. यासंदर्भात बॅनरबाजी करण्यात आली. त्यात म्हटले होते, कुलकर्णींचा मतदार संघ गेला, टिळकांचा मतदार संघ गेला, आता नंबर बापटांचा का?…समाज कुठवर सहन करणार

आणखी एक चर्चेतील बॅनर होते, त्यात म्हटले होते की, आमचेही ठरेल धडा शिकवायचा, कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा हा टिळकांचा, का काढला आमच्याकडून कसबा…

y

भाजपचा सर्व्हे

त्यानंतर भाजपने अंतर्गत सर्व्हे केला. त्यात हेमंत रासने पराभूत होणार असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपने आजारी असलेल्या गिरीश बापट यांना प्रचारात आणले. गिरीश बापट व्हिलचेअरवर बसून नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून प्रचारात सहभागी झाले होते.

त्यावेळी खासदार बापट म्हणाले होते की, हेमंतचं काम चांगलं आहे. महापालिकेच्या माध्यमातून त्याने चांगलं काम केलं आहे. हेमंतला निवडून द्या. थोडी जास्त ताकद लावा. निवडून आल्यावर मी पेढा घ्यायला परत येणार आहे. आजारी बापट यांना पाहून अनेक महिलांना आपले अश्रूही रोखता आले नव्हते. परंतु निवडणूक निकालानंतर भाजपाचे हे अस्त्रही ब्राह्मण समाजाची नाराजी दूर शकले नाही, हे स्पष्ट झाले. यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला.

भाजपचा गड गेला, कसबा पोटनिवडणुकीत १९९१ चा इतिहास २०२३ मध्ये पुन्हा घडला

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.