AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोसरी पोलिसांची मोठी कारवाई, 24 पिस्तूल आणि 38 जिवंत काडतूस जप्त

यातील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. (Bhosari Police seized 24 pistols and 38 cartridges)

भोसरी पोलिसांची मोठी कारवाई, 24 पिस्तूल आणि 38 जिवंत काडतूस जप्त
भोसरी पोलिसांची कारवाई
| Updated on: Jan 27, 2021 | 4:07 PM
Share

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यात 24 पिस्तूल आणि 38 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलिसांनी मध्यप्रदेशात सापळा रचून कारवाई केली आहे. यातील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. (Pimpri Chinchwad Bhosari Police seized 24 pistols and 38 cartridges)

पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीची प्रकरण वाढत आहे. तसेच गुन्हेगारांकडून सर्रासपणे शस्त्रांचा वापर केला जात आहे. या सर्व प्रकरणांना आळा बसावा यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कडक कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर खून, दरोडा, जबरी चोरी यासारखे अनेक गुन्हे दाखल असलेल्या आरोपी रुपेश पाटील याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 4 पिस्तूल आणि 4 काडतुसासह अटक केली. त्याने हे पिस्तूल मध्यप्रदेश येथून आणल्याचे सांगितले. यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर भोसरी पोलिसांचे एक विशेष पथक मध्यप्रदेश येथे रवाना झाले.

एकूण 12 आरोपींना अटक

यानंतर या विशेष पथकाने मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील वरल्यात उमर्टी गावातील जंगलात सापळा रचला. यानंतर पोलिसांनी पाठलाग करुन पिस्तूलचा मुख्य डीलर रॉनी उर्फ बबलूसिंग बरनाला याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण 8 पिस्तूल आणि 20 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली. (Pimpri Chinchwad Bhosari Police seized 24 pistols and 38 cartridges)

यानंतर रॉनीचा मध्यप्रदेश येथील साथीदार कालू उर्फ सुशील मांगिलाल पावरा याला 2 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली.

रॉनी आणि कालू यांनी पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात पिस्तूलचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले. यात एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली. या सर्वांवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहे. तर काहींवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे. (Pimpri Chinchwad Bhosari Police seized 24 pistols and 38 cartridges)

संबंधित बातम्या : 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘शाहीन बाग’च्या धर्तीवर ‘किसान बाग’ आंदोलन

इथे शिवभोजन थाळी मोफत मिळेल!

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.