AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक निकाल उद्या, पण आजच पिंपरी चिंचवडमध्ये लागले विजयाचे बॅनर

पिंपरी चिंचवडमध्ये निकाल आधीच आमदार अश्विनी जगताप म्हणत समर्थकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी सोमवारी पुण्यात अनेक ठिकाणी बॅनर लागले होते.

निवडणूक निकाल उद्या, पण आजच पिंपरी चिंचवडमध्ये लागले विजयाचे बॅनर
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 01, 2023 | 9:32 AM
Share

पुणे : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले होते. निकाल गुरुवारी २ मार्च रोजी येणार आहे. परंतु निकालापूर्वीच फ्लेक्सच्या माध्यमातून निकाल लावण्यात आला आहे. सोमवार व मंगळवारी कसबापेठेत निकालाआधीच विजयाचे बॅनर लावण्यात आले होते. कसबा पेठेत भाजपचे हेमंत रासने यांच्या विजयाचे बॅनर लावत शुभेच्छा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या होत्या. आता फ्लेक्शचे हे लोण पिंपरी चिंचवडमध्ये पसरले आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाचा आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे फलक लागलेत.

काय लागले फ्लेक्स

कसब्यात मतदार संघात काही ठिकाणी फ्लेक्स लावले होते. त्यात हेमंत रासने यांचा विजयी मुद्रेतील फोटो होता. त्यावर यतो धर्म: ततो जय: असं लिहिलंय. त्यानंतर आमदार हेमंत (भाऊ) रासने यांचा कसबा पोटनिवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन, अशा शुभेच्छा देणारा मजकूर फ्लेक्सवर लिहिण्यात आला आहे. आता पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाचा आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या विजयाचे फलक लागले आहेत. मंगळवारी मध्यरात्री द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाली म्हणून फलक लावण्यात आलेत. पुण्यातील फलकाचे लोण द्रुतगती मार्गावर येऊन पोहचले आहे.

निकालापूर्वी झाले आमदार

निकाल आधीच आमदार अश्विनी जगताप म्हणत समर्थकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  यापूर्वी सोमवारी पुण्यातील अनेक चौकात रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे देखील बॅनर लावण्यात आले होते. पण आता हे विजयाचे बॅनर हटवण्यात आले. त्यानंतर हेमंत रासने यांच्या विजयाचे बॅनर लागले. आता पिंपरी चिंचवडमध्ये  बॅनरबाजी करण्यात येत असल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये ३७ फेऱ्या

पिंपरी चिंचवडमध्ये एकूण २८ उमेदवार रिंगणात आहे. तरी प्रमुख लढत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतील नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यांत लढत आहे. गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीत ३७ फेऱ्यांमध्ये निकाल येणार आहे. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी गावडे कामगार भवन परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहे.

Follow Us
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....