AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri Chinchwad crime | इंस्टाग्रामवर ‘थेरगाव क्वीन’च्या 40 पेक्षा जास्त अकाऊंटबाबत पिंपरी पोलिस उचलणार ‘हे’ पाऊल

सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स वाढावेत यासाठी काही अल्पवयीन मुलामुलींकडून ही शक्कल लढवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील काही तरुणांकडून धमकीवजा अश्लील भाषेचा वापर करून व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. यातून समाजस्वास्थ्य बिघडविण्याचे कृत्य केले जात आहे.

Pimpri Chinchwad crime | इंस्टाग्रामवर 'थेरगाव क्वीन'च्या 40 पेक्षा जास्त अकाऊंटबाबत पिंपरी पोलिस उचलणार 'हे' पाऊल
Instagram
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Feb 11, 2022 | 7:05 PM
Share

पिंपरी – प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर (Social Media ) अश्लील भाषेत व्हिडीओ टाकणाऱ्या थेरगाव क्वीनवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police)नुकतीच कारवाई केली. त्यानंतर पुन्हा असे न करण्याच्या बोलीवर या अठरा वर्षीय तरुणीची पोलिसांनी सुटकाही केली आहे. त्यानंतर आता पुन्हा सोशल मीडियावर ‘थेरगाव क्वीन'(Thergaon Queen)च्या नावाने जवळपास 40  अकाऊंट असल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे तर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर याच अकाऊंट वरून खोडसाळपणा करत या विविध अकाऊंटवरून धमकीवजा व अश्लील भाषेत व्हिडिओ शेअर करून पोलिसांना आवाहन दिल्याचे समोर आले आहे.

फॉलोवर्स वाढणयासाठी शक्कल

सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स वाढावेत यासाठी काही अल्पवयीन मुलामुलींकडून ही शक्कल लढवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील काही तरुणांकडून धमकीवजा अश्लील भाषेचा वापर करून व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. यातून समाजस्वास्थ्य बिघडविण्याचे कृत्य केले जात आहे. त्यामुळे वाकड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून थेरगाव येथील एका तरुणीला अटक केली होती. तसेच तिच्या साथीदार ‘भाई’ला देखील पुण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. यापुढे असे व्हिडिओ करणार नाही, असे म्हणत या ‘भाई’ने माफी मागितली होती.

व्हिडीओ व्हायरल पोलिसांच्या कारवाई नंतरही इंस्टाग्रामवरील ‘थेरगाव क्वीन’ नावाच्या अकाऊंटवरून थेरगाव क्वीन’ असलेल्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्यातून थेट पोलिसांनाच आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी ‘थेरगाव क्वीन’ असलेल्या संबंधित तरुणीकडे याबाबत चौकशी केली. व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेले इंस्टाग्रामवरील अकाउंट संबंधित तरुणीचे नसून त्या पद्धतीचे 40 पेक्षा जास्त अकाउंट असल्याचे समोर आले. हे सर्व अकाउंट कोणाचे आहेत, ते अकाउंट कोण ऑपरेट करीत आहेत, याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मात्र अश्या प्रकारच्या बनावट अकाऊंटवरती पोलिसांची नजर असून कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट आढळ्यास सायबर गुन्ह्यांतंर्गत कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीक यांनी दिली आहे.

Pimpri Chinchwad crime | सीए च्या परीक्षेत अपयश आल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल… परिसरात खळबळ

Malegaon Hijab Day : कर्नाटकच्या घटनेचे मालेगावात पडसाद, जमेत ए उलमातर्फे ‘हिजाब दिवस’ चे आयोजन

St Worker Strike : 18 फेब्रुवारीपर्यंत विलीनीकरणाचा अहवाल सादर करा, राज्य सरकारला कोर्टाचा दणका

Follow Us
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...