LIVE : कोरोना लसीच्या किंमतीवर मोदींसोबत चर्चा झाली नाही, पुनावाला यांची माहिती

आदर पुनावाला यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे LIVE

LIVE : कोरोना लसीच्या किंमतीवर मोदींसोबत चर्चा झाली नाही, पुनावाला यांची माहिती
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 7:39 PM

पुणे : देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (28 नोव्हेंबर 2020) देशातील तीन शहरांचा दौरा केला. मोदींनी अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन शहरांचा दौरा केला. या तिन्ही ठिकाणी कोरोना लसीच्या निर्मिती केली जात आहे. या कोरोना लसीच्या प्रगतीचा मोदींनी आढावा घेतला. या भेटीनंतर आदर पुनावाला हे पत्रकार परिषद घेत आहेत. ते काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. (PM Narendra Modi Pune Visit adar poonawalas press conference Live Update)

? LIVE UPDATE ?

[svt-event date=”28/11/2020,7:20PM” class=”svt-cd-green” ] – आरोग्य मंत्रालयाकडून होणार चर्चा

– मोदींचा दृष्टीकोन समतोल वाटला

– आरोग्य मंत्रालयाकडून अंतिम निर्णय घेतला जाईल – लसीचे वितरण पहिल्यांदा भारतात होणार

– जुलै 2021 पर्यंत ३० कोटी लसींचे उद्दिष्टं

– आशिया खंडातील देशांना लस पुरवणार [/svt-event]

[svt-event title=”पुनावाला यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे” date=”28/11/2020,7:15PM” class=”svt-cd-green” ]

– पंतप्रधानांसोबत लसीवर सखोल चर्चा झाली

– लसीकरणाच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली

– लसींच्या साठवणुकीवर चर्चा झाली

– मोदींनी सिरममधील सुविधांचा आढावा घेतला

– लसीच्या किंमतीवर चर्चा झाली नाही [/svt-event]

[svt-event date=”28/11/2020,7:08PM” class=”svt-cd-green” ] मोदींच्या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली याबद्दल आदर पुनावाल पत्रकार परिषदेमध्ये माहिती देणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”मोदींच्या ‘सिरम’ भेटीनंतर आदर पुनावाला यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद ” date=”28/11/2020,6:47PM” class=”svt-cd-green” ] आदर पुनावाला यांची 7 वाजता पत्रकार परिषद, मोठ्या घोषणेची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल” date=”28/11/2020,4:47PM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहे. यानंतर आता मोदी कॉन्फरन्सिंगद्वारे शास्त्रज्ञांशी संवाद साधतील. त्यानंतर लसीची चाचणी, त्याचे वितरण याची माहिती घेतील [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल” date=”28/11/2020,4:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काही क्षणात पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल होणार ” date=”28/11/2020,3:42PM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळातच पुण्यात दाखल होतील [/svt-event]

  • त्यानंतर दुपारी 1.30 च्या सुमारास पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांनी भारत बायोटेक या कंपनीच्या कोरोना लसीचा आढावा घेतला.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9.15 वाजता अहमदाबाद विमानतळावर पोहोचले. यानंतर त्यांनी अहमदाबादमधील जायडस बायोटेक पार्कचा दौरा केला.

पंतप्रधान मोदींकडून जेडियस बायोटेक पार्कमध्ये निर्मिती होत असलेल्या कोरोना लसीचा आढावा

पंतप्रधान मोदींचा दौरा अहमदबादमधील जेडियस बायोटेक पार्क या ठिकाणाहून सुरु होईल. सकाळी 9 च्या सुमारास मोदी सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर जातील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने चांगोदर या ठिकाणी जातील. चांगोदरमध्ये जेडियस बायोटेक पार्कमध्ये निर्मिती होत असलेल्या कोरोना लसीचा आढावा घेतील.

त्यानंतर मोदी पुण्यासाठी रवाना होतील. पंतप्रधान मोदी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूटला भेट देतील. पुण्यानंतर मोदी हैदराबादमधील भारत बायोटेक या ठिकाणी भेट देतील. भारत बायोटेक ही कंपनी कोरोनाची स्वदेशी लसीची निर्मिती करत आहे.

कसा असेल मोदींचा पुणे दौरा?

देशात कोरोनाची साथ आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. राजशिष्टाचारानुसार पंतप्रधान एखाद्या राज्यात गेल्यास तेथील मुख्यमंत्री त्यांच्या स्वागतासाठी येतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला स्वागत समारंभ आणि भेटीगाठी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्यात पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार नाहीत, अशी माहिती राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यातही काहीसा बदल झाला आहे. यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी दुपारी एक वाजता सिरम इन्स्टिट्यूटमध्ये येणार होते. मात्र, आता मोदी हे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.

मोदींचा पुणे दौरा

  • पंतप्रधान मोदी 3.50 मिनिटांनी पुणे एअरपोर्टवर दाखल होतील
  • 4.15 वाजता मंजरी हेलिपॅडवर पोहोचतील
  • 4.25 वाजता सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल होतील
  • त्यानंतर तासभर मोदी सिरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीचा आढावा घेतील
  • 5.25 वाजता सिरम इन्स्टिट्यूटमधून रवाना होतील

100 देशांच्या राजदूतांची सिरम इन्स्टिट्यूट भेट रद्द

जगभरातील विविध 100 देशांच्या राजदूतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सीरम इन्स्टिट्यूट भेट अचानक रद्द झाली आहे. प्रशासनाकडून तांत्रिक कारणास्तव दौरा रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. असं असलं तरी पंतप्रधान मोदी स्वतः सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मोदी 100 देशांच्या राजदूतांसह सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. यावेळी सर्व राजदूत कोरोना लसीसंदर्भात आढावा घेणार होते. मात्र राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी संबंधित राजदूतांचा हा महत्त्वाचा पुणे दौरा रद्द झाल्याची माहिती दिली आहे. (PM Narendra Modi Pune Visit Live Update)

संबंधित बातम्या : 

पंतप्रधान मोदी आज चार वाजता पुण्यात; PMOच्या सूचनेमुळे मुख्यमंत्री स्वागताला जाणार नाहीत

मोठी बातमी : 100 देशांच्या राजदूतांची सीरम इन्स्टिट्यूट भेट रद्द

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.