पंतप्रधान मोदी आज चार वाजता पुण्यात; PMOच्या सूचनेमुळे मुख्यमंत्री स्वागताला जाणार नाहीत

देशात कोरोनाची साथ आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. | PM Narendra Modi

पंतप्रधान मोदी आज चार वाजता पुण्यात; PMOच्या सूचनेमुळे मुख्यमंत्री स्वागताला जाणार नाहीत
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 12:08 AM

पुणे: कोरोना लशीची निर्मिती होत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्य़ासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येणार आहेत. राजशिष्टाचारानुसार पंतप्रधान एखाद्या राज्यात गेल्यास तेथील मुख्यमंत्री त्यांच्या स्वागतासाठी येतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला स्वागत समारंभ आणि भेटीगाठी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्यात पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार नाहीत, अशी माहिती राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली आहे. (PM Modi set to visit Serum Institute Pune tomorrow)

देशात कोरोनाची साथ आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका असूनही राज्यातील महत्त्वाचे नेते त्यांच्या स्वागतासाठी पुण्यात जातील, अशी शक्यता होती. मात्र, आता पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनंतर ही शक्यता मावळली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यातही काहीसा बदल झाला आहे. यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी दुपारी एक वाजता सिरम इन्स्टिट्यूटमध्ये येणार होते. मात्र, आता मोदी हे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून काल देण्यात आली होती.

100 देशांच्या राजदूतांची सिरम इन्स्टिट्यूट भेट रद्द

जगभरातील विविध 100 देशांच्या राजदूतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सीरम इन्स्टिट्यूट भेट अचानक रद्द झाली आहे. प्रशासनाकडून तांत्रिक कारणास्तव दौरा रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. असं असलं तरी पंतप्रधान मोदी स्वतः सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मोदी 100 देशांच्या राजदूतांसह सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. यावेळी सर्व राजदूत कोरोना लसीसंदर्भात आढावा घेणार होते. मात्र राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी संबंधित राजदूतांचा हा महत्त्वाचा पुणे दौरा रद्द झाल्याची माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या:

Corona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार

कोरोनावरील लस वितरणासाठी केंद्र सरकारचं मेगा प्लॅनिंग, सिरम, भारत बायोटेक आणि मॉडर्ना कंपनीशी संपर्क

कोरोना लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार , आगामी अर्थसंकल्पात 500 अब्ज रुपयांची तरतूद?

(PM Modi set to visit Serum Institute Pune tomorrow)

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.